शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता, शूटर शिवाच्या चौकशीत खुलासा (फोटो सौजन्य-X)
मुंबईतील वांद्रे येथे 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. शूटर शिवकुमार हा हत्येनंतर घटनास्थळी थांबून होता. शिवाय त्यानंतर तो लिलावती रुग्णालयात आणि 30 मिनिटे थांबून सिद्दीकींच्या मृत्यूची खात्री केली,अशीही माहिती पोलीस चौकशीतून पुढे आली. त्याचदरम्यान, आता अजून एक मोठी अपडेट पोलीस चौकशीत समोर आली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचणारा शुभन लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता असल्याची माहिती मिळत आहे. शुभम हा बिष्णई गँगचा सदस्य आहे. नेमबाज शिवकुमारच्या तपासाबाबत केवळ माहिती समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखा आणि उत्तर प्रदेश एसटीएफने रविवारी 10 नोव्हेंबरला शुटर शिवकुमारला अटक करण्यात आली. शिवकुमारसह दोघा जणांना गुन्हे शाखेने अटक केली. उत्तर प्रदेशच्या बेहाराईच येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. शिवकुमार नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती होती.
बाबा सिद्दीकींवर गोळी झाडल्यानंतर आरोपी हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचला अन्…, चौकशीत धक्कादायक खुलासा
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्य शूटर शिवकुमारने एक धक्कादायक खुलासा केला होता.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर शिवकुमारने घटनास्थळीच एक बॅग फेकली. या बॅगेत तो शर्ट, पिस्तूल आणि आधारकार्ड घेऊन आला होता. पोलिसांचे म्हणणे आहे की, या घटनेनंतर लोक घाबरले आणि पोलिस तेथे पोहोचले तेव्हा शिवकुमारने पाहिले की पोलिस लोकांना हल्लेखोरांची माहिती विचारत आहेत. त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी घटनास्थळी अटक केल्याचेही त्याने पाहिले.
घटनेनंतर शिवकुमार एका ऑटोरिक्षाने लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला,सिद्दीकींच्या मृत्यूची खात्री केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 10:47 वाजता शिवकुमार हॉस्पिटलमधून बाहेर पडला आणि कुर्ला रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाला. त्याने आपला मोबाईल कुठेतरी फेकून दिला, ज्याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींच्या चौकशीदरम्यान, वॉन्टेड आरोपी शुभम लोणकर हा तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. शुभम लोणकरने जुलै महिन्यात छत्तीसगडच्या बिलासपूरपासून 50 किलोमीटर दूर घनदाट जंगलात एके-47 रायफलचे प्रशिक्षण घेतले होते.
शुभम लोणकर हा अटक आरोपी विलास आपुणे आणि रुपेश मोहोळ यांच्यासोबत होता. शुभम लोणकर यांना काही लोकांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्र चार दिवस चालले आणि ते पाच दिवस तिथे राहिले. शुभम लोणकर याने नक्षलवाद्यांकडून शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण घेतले होते का, याचा तपास करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले. प्रशिक्षणाबाबत कोणाशीही चर्चा करू नका, असा इशारा लोणकर यांनी अपुणे व मोहोळ यांना दिला होता. पुण्यातील एक नगरसेवक लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टमध्ये असल्याची माहितीही मिळाली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात अटक करण्यात आलेला आरोपी अनुराग आणि ज्ञानप्रकाश त्रिपाठी यांच्यातील पैशांचा व्यवहारही पोलिसांनी उघड केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी भंगार व्यापारी हरीश कुमार यांना पैसे पाठवले होते. हरीशने ते पैसे इतर खात्यात ट्रान्सफर केले आणि त्याचे एटीएम कार्ड वापरून आरोपींना पैसे दिले. 66 वर्षीय राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची आमदार पुत्र जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत तीन शूटर सहभागी होते.
बाबा सिद्दीकी यांची सलमान खानशी संबंधित असलेल्या कारणावरून करण्यात आली हत्या, शूटरने केला खुलासा!