Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदलापूर प्रकरण: आरोपीच्या वडीलांचा खळबळजनक दावा; अक्षयची वैद्यकीय तपासणीची मागणी

ज्यावेळी ग्रामस्थांनी अक्षय शिंदेच्या घरावर हल्ला केला, त्यावेळी त्याच्या घरात लहान मुलांची खेळणीही आढळून  आली. त्यामुळे ही खेळणी कुठून आली,असाही सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. याप्रकऱणाचा तपास करण्यासाठी एसआयटी पथक  नेमले जाणार असल्याची माहिती आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 23, 2024 | 11:05 AM
बदलापूर प्रकरण: आरोपीच्या वडीलांचा खळबळजनक दावा; अक्षयची वैद्यकीय तपासणीची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

बदलापूर: बदलापूरच्या घटनेपासून राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. आरोपीला लवकरात लवकर आणि फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण बदलापूर रस्त्यावर उतरले होते.या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.अशातच आरोपी अक्षय शिंदेंच्या वडीलांनी आपल्या मुलाला फसवले जात असल्याचा दावा केला आहे. यामुळे आता या प्रकरणला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय शिंदेच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याची  तक्रार दिली आहे. तसेच,अक्षयची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात यावी. वैद्यकीय तपासणीतून अक्षयच्या निर्दोष असल्याचा पुरावा मिळू शकतो, असाही दावा आरोपी अक्षय शिंदेच्या वडीलांनी केला आहे.

हेदेखील वाचा: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नवा सर्व्हे; निवडणुकांसाठी कसा आहे जनतेचा कल? ‘हे’ आहेत मोठे मुद्दे

त्याचबरोबर अक्षयच्या आईनेही काही दावे केले आहेत. अक्षयला कामाला लागून केवळ 15 दिवस झाले होते. 13 ऑगस्टला घटना घडली. पोलिसांनी 17 तारखेला  अक्षयला अटक केली. शाळेत काम करणाऱ्या एका बाईने, पोलीस अक्षयला घेऊन गेल्याचे सांगितले. तेवढीच माहिती आमच्याकडे आहे. पोलिसांनी आमच्या लहान मुलालाही मारहाण केली, असा दावा आरोपी अक्षयच्या आईने केला आहे.

या घटनेनंतर बुधवारी अक्षय शिंदे राहत असलेल्या खरवई गावातील गावातील ग्रामस्थही आक्रमक झाले. खरवईपासून काही अंतरावर असलेल्या एका चाळीत अक्षय शिंदेचे कुटुंब राहते. ही घटना उघडकीस येताच गावातील ग्रामस्थांनी घरात घुसून त्याच्या कुटुंबीयांना घराबाहेर काढले, त्यांच्या सामानाचीही तोडफोड केली. गावकऱ्यांनी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांना घरातून हाकलून देत गाव सोडण्यास जबरदस्ती केल्याचे सांगितले जात आहे.

हेदेखील वाचा: वेदा आणि खेल खेल में चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईट स्थितीत! जाणून घ्या 8व्या दिवसाची कमाई

धक्कादायक म्हणजे, ज्यावेळी ग्रामस्थांनी अक्षय शिंदेच्या घरावर हल्ला केला, त्यावेळी त्याच्या घरात लहान मुलांची खेळणीही आढळून  आली. त्यामुळे ही खेळणी कुठून आली,असाही सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. याप्रकऱणाचा तपास करण्यासाठी एसआयटी पथक  नेमले जाणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Badlapur case accuseds father demands medical examination of akshay nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 11:05 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.