Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh: हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटेबाबत कोर्टाचा ‘हा’ मोठा निर्णय; कराडचे काय होणार?

वाल्मीक कराडवर मोक्का लावावा आणि लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय द्यावा यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज आंदोलन केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 13, 2025 | 05:48 PM
संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज 11.30 वा सुनावणी

संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज 11.30 वा सुनावणी

Follow Us
Close
Follow Us:

बीड:  सरपंच संतोष देशमुख याच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले आहे. अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अजून फरार आहे. तर आज वाल्मीक कराडवर मोक्का लावावा आणि लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय द्यावा यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज आंदोलन केले. तसेच सरकारला उद्या  10 पर्यंतचा अलटीमेटम दिला आहे. दरम्यान या प्रकरणात विष्णू चाटे हा मुख्य आरोपी आहे. तर वाल्मीक कराडला सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान आज मुख्य आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी संपली असल्याने त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान आज कोर्टात विष्णू चाटेच्या कोठडीवर सुनावणी पार पडली. यामध्ये कोर्टाने विष्णू चाटेच्या कोठडीत 6 दिवसांची वाढ केली आहे. कोर्टाने विष्णू चाटेला 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विष्णू चाटे हा वाल्मीक कराडचा मावस भाऊ असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान या प्रकरणात वाल्मीक कराडला देखील केज कोर्टाने 14 दिवसांची सीआयडी कोहडी सुनावली होती. वाल्मीक कराडची देखील कोठडी उद्या संपत आहे. त्यामुळे वाल्मीक कराडला उद्या कोर्टात हजर करण्यात येईल. त्यानंतर सुनावणीदरम्यान कोर्ट वाल्मीक कराडला कोणती कोठडी सुनावते हे पहावे लागणार आहे. दरम्यान देशमुख कुटुंबांकडून वाल्मीक कराडवर मोक्का कायदा लावावा अशी मागणी केली जात आहे.

संतोष देशमुखांच्या पत्नीचा महत्त्वाचा जबाब

सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनीही नुकताच सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला होता. या जबाबात अश्विनी देशमुख यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक महिना आधी त्यांना वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेकडून धमकी देण्यात आली होती. जीवे मारण्याची धमकी दिल्याने संतोष देशमुख होते अस्वस्थ असा जबाबा पत्नी अश्विनी देशमुख यांनी cid कडे दिला आहे. देशमुख यांना नोव्हेंबर महिन्यात धमकी मिळाली होती.त्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Santosh Deshmukh : एक महिना आधीच मिळाली होती जीवे मारण्याची धमकी, संतोष देशमुखांच्या पत्नीचा महत्त्वाचा जबाब

अश्विनी देशमुख यांच्या जबाबानुसार, नोव्हेंबर महिन्यात वाल्मिकी कराड आणि विष्णू चाटे यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली होती. तेव्हापासून संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते. अश्विनी देशमुख यांचा हा जबाब 3 जानेवारीला नोंदवण्यात आल्याचे समजत आहे. सीआयडीने याप्रकरणात वाल्मिक कराड वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का लावला होता. मात्र, वाल्मिक कराड यांच्यावरही मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करून सीआयडीच्या तपासाचा निषेध करण्यासाठी टॉवरवर चढण्याची प्रत्यक्ष घोषणा केली होती. पार्श्वभूमीवर असलेल्या मस्साजोग गावात असलेल्या टॉवर कॉम्प्लेक्समध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

Web Title: Beed court give judicial cutosdy to santosh deshmukh case main accused vishnu chate latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • Santosh Deshmukh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.