एक महिना आधीच मिळाली होती जीवे मारण्याची धमकी, संतोष देशमुखांच्या पत्नीचा महत्त्वाचा जबाब (फोटो सौजन्य-X)
Santosh Deshmukh News Marathi : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे गावचे सरपंच संतोष देशमुख (४४) यांची हत्या करण्यात आली. ९ डिसेंबर रोजी ही निर्घृण हत्या झाली असून रस्त्यात संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि नंतर मृतदेह ४० किलोमीटर अंतरावर फेकून दिला. या घटनेला एक महिन्याहून अधिक काळ उलटून गेला आहे तरी या हत्येचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकूण ८ जणांना अटक केली. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी करत आहेत आणि दररोज नवीन खुलासे होत आहेत. याचदरम्यान आता संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी महत्त्वाचा जबाब दिला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनीही नुकताच सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला होता. या जबाबात अश्विनी देशमुख यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक महिना आधी त्यांना वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेकडून धमकी देण्यात आली होती. जीवे मारण्याची धमकी दिल्याने संतोष देशमुख होते अस्वस्थ असा जबाबा पत्नी अश्विनी देशमुख यांनी cid कडे दिला आहे. देशमुख यांना नोव्हेंबर महिन्यात धमकी मिळाली होती.त्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अश्विनी देशमुख यांच्या जबाबानुसार, नोव्हेंबर महिन्यात वाल्मिकी कराड आणि विष्णू चाटे यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली होती. तेव्हापासून संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते. अश्विनी देशमुख यांचा हा जबाब 3 जानेवारीला नोंदवण्यात आल्याचे समजत आहे. सीआयडीने याप्रकरणात वाल्मिक कराड वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का लावला होता. मात्र, वाल्मिक कराड यांच्यावरही मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करून सीआयडीच्या तपासाचा निषेध करण्यासाठी टॉवरवर चढण्याची प्रत्यक्ष घोषणा केली होती. पार्श्वभूमीवर असलेल्या मस्साजोग गावात असलेल्या टॉवर कॉम्प्लेक्समध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्या विरोधामुळे टीकेची लाट उसळली होती. मात्र, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांचा बचाव केला होता. याच लक्ष्मण हाके यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारच्या पत्रकार परिषदेपूर्वी लक्ष्मण हाके यांना धमकी देण्यात आल्याचे समजते. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून फोनवरून धमकी देण्यात आल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
दरम्यान, आजच्या आंदोलनात मराठा आंदोलक मनोज जरंगे देखील सहभागी होत असल्याचे मसाजोग यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर, मस्साजोग वातावरण तापू लागले आहे.
Santosh Deshmukh Case: धनंजय देशमुखांचा आत्मदहनाचा इशारा; राज्य सरकार काय निर्णय घेणार?