बीड, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. बीड जिल्हा रुग्णालयात प्रसुतीदरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात आठवडाभरात प्रस्तुतीदरम्यान ३ महिलांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर दोन दिवसांमध्ये दोन महिलांचा प्रस्तुतीदरम्यान मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या जिल्हा रुग्णालयात सोमवारी आणखी एका मातेचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याने बीड जिल्हा रुग्णालय चर्चेत आले आहे. आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. रुक्मीन परशुराम टोने असे मृत मातेचे नाव आहे. १३ एप्रिल रोजी सकाळी रुक्मिणी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे सिजर झाले. यादरम्यान त्यांनी २३०० ग्राम वजनाच्या मुलाला जन्म दिला. ही त्यांची चौथी प्रसूती होती.
उपचारादरम्यान मृत्यू गर्भवती महिलेवर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुक्मिणी यांना पूर्वीपासून हृदयाशी संबंधित आजार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना रेफरचा सल्लाही देण्यात आला होता. परंतू त्या गेल्या नाहीत. मात्र बीड जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी एका मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात चालले काय ? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
केंदूरमध्ये जमिनीच्या वादातून बहिणींसह वडिलांना मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल
एक दिवसाआधीच एका गर्भवतीचा झाला होता मृत्यू बीड जिल्हा रुग्णालयात रविवारी प्रसुतीदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता. छाया गणेश पांचाळ असे मृत महिलेचे नाव होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर प्रसुती व्यवस्थित करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नर्सला २००० रुपये देऊनही त्यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप महिलेच्या नवऱ्याने केला. या महिलेचा | देखील मृत्यू प्रसुतीनंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे झाल्याचे सांगितले जात आहे.