बीडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या काही वर्षांपासून बीडमधील ऊसतोड मजूर महिलांचे गर्भाशय काढून टाकण्याचा प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या महिन्यातच बीडमध्ये तब्बल ८४३ महिलांचे गर्भाशय काढून टाकल्याची माहिती आहे.
एका पोलीस कर्मचाऱ्यानेच १० लाख रुपयांसाठी पत्नीचा छळ केल्याचं समोर आलं आहे.या प्रकरणी चौंघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
बँकेचे कर्मचारी बँकेच्या आवारात दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना या सुरेश जाधव यांचा मृतदेह दिसल्यानंतर एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.
बीडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 30 ते 35 वयोगटातील तब्बल 843 महिलांचे गर्भाीशय काढण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या महिलांना ऐन तारुण्यात मरणयातना सहन कराव्या…
गुरुवारी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी यार्डमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या सुरक्षारक्षक रूप सिंग टाकलाने चोरट्यांवर गोळीबार केला.
बीड जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ३ जून २०२५ पर्यंत जिल्ह्यात ड्रोन व अन्य मानव रहित यंत्र उडविण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
बीड जिल्हा पोलीस दल पुन्हा एकदा चर्चेत आले असून, पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानातच एका पोलीस कर्मचाऱ्याने गांजा ओढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
काल रात्री संतोष देशमुख यांच्या घरी एक अज्ञात महिलेने प्रवेश केला. रात्रभर घराबाहेर असलेल्या मंडपात मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिने घरातील बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा आग्रह धरला
लग्नाच्याच दिवशी बीडमध्ये एका तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे. छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला वैतागून या तरुणीने मामाच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज २० एप्रिल रोजी तरुणी विवाहबंधनात अडकणार होती.
त्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन देवळातील आवाज कमी करण्याची विंनती केली. पण त्या कर्मचाऱ्यानेही त्याने नॉनव्हेज खाल्ल्यामुळे देवळात जाऊ शकत नाही, असे सांगत आवाज बंद करण्यास नकार दिला
मी सस्पेंड झालो म्हणून बोलतोय आधी बोललो असतो तरीही उपासमारीची वेळ आली असती, आताही उपासमारीचीच वेळ आली आहे, म्हणून बोलतोय. सरळ सरळ उत्तर आहे. आता मला खात्यातूनच डिसमिस करतील
तो काही दिवसांपूर्वी दिल्लीहून पुण्यात परतला होता आणि स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबला होता. आज पहाटेच्या सुमारास बीड पोलिसांनी त्या हॉटेलवर छापा टाकत त्याला ताब्यात घेतले.
वाल्मिक कराड मुंडेंनी केलेल्या गुन्ह्यांची अंडी पिल्ली बाहेर काढणार होता, म्हणून मला धनंजय मुंडेंनीच कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिली होती. असा दावा कासलेंनी केला होता.
Beed Crime News: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा सातत्याने चर्चेत आहे. वाल्मीक कराड, धनंजय मुंडे यांची नावे देखील या प्रकरणात चर्चेत आहेत.
एक दिवसाआधीच एका गर्भवतीचा झाला होता मृत्यू बीड जिल्हा रुग्णालयात रविवारी प्रसुतीदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता. छाया गणेश पांचाळ असे मृत महिलेचे नाव होते.
वाल्मिक कराड यांच्या संदर्भात सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात कराड यांच्यावर खंडणी मागणी आणि मकोका कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात