बीड: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेला अखेर अटक करण्यात आली आहे. तो आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असून, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सतीश भोसले आज स्वतः पोलिसांसमोर हजर होण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच बीड पोलिस आणि प्रयागराज पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
सतीश भोसलेला अटक केल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हा खोक्या भोसले फरार होता. पोलिसांची पथकेही त्याचा शोध घेत होते. आम्हाला सतीश भोसलेचे शेवटचे लोकशन प्रयागराज याठिकाणी दिसले. त्यांनंतर उत्तर प्रदेश आणि प्रयागराज पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी सापळा रचून सतीश भोसलेला अखेर ताब्यात घेतले. आमची टीम ऑन द वे आहे, उत्तर प्रदेशातून आमची टीम त्यांला ताब्यात घेईल.
Satish Bhosale Arrested : सतीश उर्फ खोक्या भोसलेला उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून अटक
दुसऱ्या राज्यातून आरोपीला अटक केल्यास त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया काय असते? असे विचारले असात कौवत म्हणाले की, दुसऱ्या राज्यातून आरोपीला अटक केल्यामुळे त्याची ट्रान्झिट रिमांड घ्यावी लागते, तसेच स्थानिक न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला महाराष्ट्रात आणले जाईल.
सतीश भोसलेने माध्यमांशी संवाद साधला पण तो पोलिसांना भेटत नव्हता. असे विचारण्यात आले. यावर बोलताना नवनीत कौवत म्हणाले की, हे चुकीचं आहे. आम्ही त्याच्या शोधात होतो. पण तो पोलिसांना भेटत नव्हता, पोलीस आणि मीडिया दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यात दोन्ही विभागांबाबत आरोपींचा वेगवेगळा विचार असतो. पण आमची टीम त्याच्या मागावर होती आणि त्याचा रिझल्ट तुम्ही पाहिला आहे. सतीश भोसले कसा पळाला त्याला पळून जाण्यात कुणी कुणी मदत केली,त्या सर्वांवर कारवाई होणार आहे. सतीश भोसले उद्या किंवा परवा त्याला महाराष्ट्रात हजर केले जाऊ शकते. जितक्या लवकरात लवकर इथे आणता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.