Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara Accident: पंपावरून निघाली बोलेरो, काही सेकंदांतच भीषण अपघात; महिला-चिमुकल्यांसह ९ जणांचा मृत्यू

पेट्रोल पंपावरून एक वाहन महामार्गावर आले आणि अवघ्या काही सेकंदांत सगळं काही बदललं. भरधाव बोलेरोने ट्रकला दिलेल्या धडकेचा थरारक घटनाक्रम CCTVमध्ये कैद झाला आहे. या भीषण अपघातात महिला आणि चिमुकल्यांसह तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनेने भंडारा हादरलं.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 11, 2026 | 04:18 PM
Bhandara Accident: पंपावरून निघाली बोलेरो, काही सेकंदांतच भीषण अपघात; महिला-चिमुकल्यांसह ९ जणांचा मृत्यू

Bhandara Accident: पंपावरून निघाली बोलेरो, काही सेकंदांतच भीषण अपघात; महिला-चिमुकल्यांसह ९ जणांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल पंपातून हायवेवर येताच काही सेकंदांत घडला अपघात
  • CCTVमध्ये अपघातापूर्वीचा संपूर्ण घटनाक्रम कैद
  • महिला आणि चिमुकल्यांसह मृतांचा आकडा ९ वर
 

भंडारा: भंडारा जिल्ह्यातील नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगावजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. पेट्रोल पंपावरून महामार्गावर येत असलेल्या ट्रकला भरधाव बोलेरो वाहनाने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बोलेरोचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत महिला आणि चिमुकल्यांसह आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

पंपावरून हायवेवर आली अन् काही सेकंदांत अपघात

प्राथमिक माहितीनुसार, ट्रक पेट्रोल पंपावरून महामार्गावर येत होता. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या बोलेरो वाहनाने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. वाहनाचा वेग अधिक असल्याने ही धडक अत्यंत भीषण झाली. अपघातात बोलेरोचे मोठे नुकसान झाले असून, त्यातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा नऊवर पोहोचला.

हेही वाचा: Ahilyanagar Accident: एकाच दिवशी ३ जिल्ह्यांसाठी काळा दिवस; तीन अपघातांत २१ जणांचा बळी

चिमुकल्यांसह महिलांचा दुर्दैवी मृत्यू

या अपघातात तीन चिमुकल्यांसह महिलांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी मदतकार्य करत जखमींना बाहेर काढण्यास पोलिसांना सहकार्य केले.

हेही वाचा: एक वर्षाची प्रतीक्षा संपली,वनतारातून नांदणी मठाकडे माधुरीची घरवापसी; आरोग्याच्या सूचनांसह परतीला मंजुरी

अपघातापूर्वीचे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद

या भीषण दुर्घटनेपूर्वीचे काही क्षण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. फुटेजमध्ये बोलेरो वाहन महामार्गावरून येताना दिसत असून, त्यानंतर काही क्षणांतच अपघात झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून अपघाताचा नेमका घटनाक्रम तपासला जात आहे. बोलेरोचा वेग अधिक असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे आणि त्यातून ट्रकला मागून धडक बसली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या दुर्घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताचा पुढील तपास संबंधित पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.

Web Title: Bhandara accident bolero leaves fuel station horrific crash follows within seconds 9 dead including women and children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 04:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.