पुणे: जेष्ठ महिलेचा सांभाळ करण्यासाठी ठेवलेल्या एका केअरटेकर महिलेनेच दागिने चोरून पोबारा केल्यानंतर या महिलेला बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तिच्याकडून ८ लाख ७० हजार रुपयांची सोन्याची लगड जप्त करण्यात आली. गायत्री सुनील हातेकर (वय २४, रा. चव्हाणनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
नोव्हेंबर महिन्यात ही घटना घडली होती. पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर साळुंखे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मनोजकुमार लोंढे, सहायक निरीक्षक संजय निकुंभ, उपनिरीक्षक शशांक जाधव, आशिष गायकवाड, राहुल शेलार, नितीन कातुर्डे, गोकुळा काटकर यांनी ही कामगिरी केली.
पुणे हादरलं! तरुणावर कोयत्याने हल्ला
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्षांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या साथीदाराने एका चोवीस वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला केला. त्याचा हात मनगटापासून तोडला असून, त्याच्या डोक्यावर व हात आणि पायावर वार करण्यात आले आहेत. तर त्याच्या एका मित्राला देखील मारले आहे. एकमेकांकडे रागात बघण्याच्या कारणावरून हा वाद झाला होता. ही घटना बिबवेवाडी परिसरात घडली. पियुष पाचकूडवे (वय २४) हा हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणावर ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आणखी एक शस्त्रक्रिया केली जाणार आहे.