Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप आमदाराच्या मुलीचा मंदिरात राडा; पीएसआय च्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल

कर्नाटकात भाजप आमदाराच्या मुलीने महिला पीएसआयला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरात वाद झाल्यानंतर आमदारकन्येने महिला उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. घटनेनंतर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 25, 2026 | 03:35 PM
भाजप आमदाराच्या मुलीचा मंदिरात राडा; पीएसआय च्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल

भाजप आमदाराच्या मुलीचा मंदिरात राडा; पीएसआय च्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • कर्नाटकात भाजप आमदारच्या मुलीकडुन पीएसआयला कानशिलात
  • मंदीर परीसरीत आमदार कन्येचा धींगाना
  • महीला पोलिसाचा अपमान केल्याने गुन्हा दाखल
मंड्या : कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात मंदिरात गर्दी नियंत्रणासाठी तैनात असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत झालेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप आमदार बी. सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या गौडा हिने महिला उपनिरीक्षक सविता बी. पाटील यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रकरणाला पुन्हा उधाण आले आहे.

ही घटना श्रीरंगपट्टण येथील ‘आरती उक्कडा’ मंदिरात ‘भीम अमावस्या’च्या दिवशी घडल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने पोलिसांकडून गर्दीचे नियोजन केले जात होते. याच वेळी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यावरून ऐश्वर्या गौडा आणि पीएसआय सविता पाटील यांच्यात वाद झाला.

पुणे रेल्वे स्थानकात बुकिंग क्लार्कवर चाकूने सपासप वार; तब्बल 150 सीसीटीव्ही तपासणीनंतर टोळीला पकडले

गर्भगृहात प्रवेशावरून वाद

सविता पाटील यांना मंदिर परिसरात गर्दी नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, ऐश्वर्या गौडा काही जणांसोबत मंदिरात आल्या आणि रांगेत न थांबता गर्भगृहात जाण्याचा प्रयत्न केला. भाविकांची गर्दी लक्षात घेता सविता यांनी त्यांना काही वेळ थांबण्यास सांगितले. यावरून दोघींमध्ये वाद झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ऐश्वर्या यांनी आपण आमदाराची मुलगी असल्याचे सांगत आपल्याला का अडवण्यात येत आहे, असा सवाल केल्याचा आरोप आहे. त्यानंतर वाद वाढला. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही महिला मंदिराच्या गर्भगृहाजवळ एकमेकींसोबत झटापट करताना दिसत आहेत. याच दरम्यान महिला पीएसआय ला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

पीएसआय कडून तक्रार, आमदारकन्येचीही प्रति-तक्रार

या घटनेनंतर पीएसआय सविता पाटील यांनी क्यातनहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ऐश्वर्या गौडा यांच्याविरुद्ध सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला करणे, दुखापत करणे, अपमान करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे यांसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. दरम्यान, ऐश्वर्या गौडा यांनीही प्रति-तक्रार दाखल केली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्याने आपला अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंचे आरोप-प्रत्यारोप समोर आले आहेत.

Exclusive: CCTV footage of BJP MLA Suresh Gowda’s daughter Aishwarya slapping a woman PSI The altercation happened at Arathi Ukkada temple in Srirangapatna on Bheema Amavasya. The incident reportedly involved PSI Savitha B. Patil and the daughter of Tumakuru BJP MLA Suresh… pic.twitter.com/Krj4M8nuIX — Imran Khan (@KeypadGuerilla) August 24, 2026

आमदार सुरेश गौडांनी मागितली माफी

या घटनेनंतर भाजप आमदार सुरेश गौडा यांनी आपल्या मुलीकडून काही चूक झाली असल्यास तिच्या वर्तनाबद्दल माफी मागितली आहे. तसेच मंदिरात व्हीव्हीआयपी संस्कृतीला प्रोत्साहन मिळू नये, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या घटनेची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Web Title: Bjp mla slaping psi in krnatka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 03:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.