Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, नदीत सापडले तीन मृतदेह , 13 आमदारांची घरे जाळली

Manipur Violence: मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार रविवारी आणखी तीव्र झाला. संतप्त जमावाने आणखी तीन भाजप आमदार आणि काँग्रेसच्या एका आमदाराची घरे जाळली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 18, 2024 | 12:19 PM
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, नदीत सापडले तीन मृतदेह , 13 आमदारांची घरे जाळली (फोटो सौजन्य-X)

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, नदीत सापडले तीन मृतदेह , 13 आमदारांची घरे जाळली (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. पुन्हा एकदा मणिपूरमध्ये जाळपोळीच्या घटना घडत आहेत. याचदरम्यान मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात तीन महिला आणि तीन मुलांचे मृतदेह सापडल्यानंतर शनिवारी (16 नोव्हेंबर) इम्फाळ खोऱ्यातील विविध भागात आंदोलक हिंसक झाले. त्यानंतर अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच मणिपूरमध्ये इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. जमावाने शनिवारी तीन राज्यमंत्री आणि सहा आमदारांच्या निवासस्थानावरही हल्ला केला होता. पोलिसांनी आतापर्यंत या हिंसाचारात सहभागी 23 जणांना अटक केली आहे. आणखी काही मृतदेह तरंगताना सापडले असून, त्यानंतर तणाव आणखी वाढला आहे.

दक्षिण आसाममधील बराक नदीत पोत्यात भरलेले एक महिला आणि मुलीचे मृतदेह वाहून गेले. शेजारच्या मणिपूर राज्यात सहा मृतदेह सापडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. हिंसाचारग्रस्त जिरीबाममधील विस्थापित लोकांसाठी बांधण्यात आलेल्या मदत शिबिरातून या तीन महिला आणि तितकीच मुले बेपत्ता झाल्याचे समजते. आसाममधील कचारमधील चिरीघाट आणि त्याच जिल्ह्यातील सिंगरबंद III येथून आणखी दोन मृतदेह आढळून आले.

मणिपूरच्या जिरीबाममध्ये सापडले तीन महिलांचे मृतदेह, 5 दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीनंतर 6 जण बेपत्ता

या घटनेसंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंददास कोन्थौजम यांची निंगथौखॉन्ग, भाजप आमदार वाय राधेश्याम यांची लँगमेडोंग मार्केट, थौबल जिल्ह्यातील भाजप आमदार पूनम ब्रोजेन आणि इंफाळ पूर्व जिल्ह्यातील काँग्रेस आमदार लोकेश्वर यांची घरे जाळली. दुर्दैवाने या काळात आमदार व त्यांचे कुटुंबीय घरी उपस्थित नव्हते. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून घरे पूर्णपणे जळून खाक होण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळवले. आंदोलकांनी शनिवारी रात्री इंफाळ पूर्व भागातील मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा दलांनी त्यांना 100-200 मीटर अगोदरच रोखले. त्यानंतर जमावाने टायर जाळले आणि बिरेन यांच्या घराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहनांची वाहतूक रोखली.

दरम्यान, अतिरेक्यांनी रात्रभर जिरीबाम शहरातील किमान दोन चर्च आणि तीन घरांना आग लावली. दंगलखोरांनी अधिक जाळपोळ केल्याच्या बातम्याही आल्या आहेत. परंतु या दाव्यांची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. इंफाळ खोऱ्यात 13 आमदारांच्या घरांवर रात्रभर जाळपोळ आणि जमावाने केलेल्या हल्ल्यानंतर ही बातमी आली आहे. यातील नऊ आमदार भाजपचे होते. हिंसाचार कमी होताना दिसत असतानाच, भाजप आमदार कोंगखाम रॉबिंद्रो यांना भेटण्याची मागणी करणाऱ्या जमावाने रविवारी संध्याकाळी इंफाळ पश्चिम येथील त्यांच्या वडिलोपार्जित घराची तोडफोड केली, असे पोलिसांनी सांगितले.

इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम आणि बिष्णुपूर जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी आणि इंटरनेट बंदी दरम्यान तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांनी २३ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक, 32 पिस्तूल, सात राउंड दारूगोळा आणि आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. लष्कर आणि आसाम रायफल्सने हिंसाचारग्रस्त भागात ध्वज मार्च काढला, ज्यामध्ये आठ नागरिक जखमी झाले. सीआरपीएफचे डीजी अनिश दयाल सिंग सुरक्षा प्रतिसाद पाहण्यासाठी इंफाळला पोहोचले असल्याची माहिती मिळत आहे.

तसेच मणिपूरमध्ये सप्टेंबर महिन्यातही हिंसाचार झाला होता. आसामच्या सीमेजवळच्या जिरीबात जिल्ह्यात सात सप्टेंबरला हिंसाचार झाला. यात चार संशयित कट्टरपंथी आणि एका सामान्य व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा मणिपूर धगधगतं आहे. अशातच नॅशनल पीपल्स पार्टीने बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढला आहे.

10 अर्भकांचा होरपळून मृत्यू तर 16 जण गंभीर जखमी, मेडिकल कॉलेजच्या NICU मध्ये भीषण आग

Web Title: Body of 2 year old is grandmother recovered from river in manipur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 12:19 PM

Topics:  

  • Manipur
  • Manipur Violence

संबंधित बातम्या

PM Modi: “42 देशांचा दौरा केला मात्र मणिपूरमध्ये…”; मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
1

PM Modi: “42 देशांचा दौरा केला मात्र मणिपूरमध्ये…”; मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार…
2

Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार…

Manipur Politics : मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय हालचाली, भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा
3

Manipur Politics : मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय हालचाली, भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

2000 वर्षे जुने पर्यटनस्थळ जिथे आहे अदृश्य शक्तींचा वास, विशालकाय दैत्य घेऊन आले होते पाषाण
4

2000 वर्षे जुने पर्यटनस्थळ जिथे आहे अदृश्य शक्तींचा वास, विशालकाय दैत्य घेऊन आले होते पाषाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.