मुंबईतील धक्कादायक घटना, स्कायवॉकजवळ सापडला लटकलेला मृतदेह (फोटो सौजन्य-X)
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकजवळ एका व्यक्तीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. सध्या पोलीस पथक या घटनेचा तपास करत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा आत्महत्येचा प्रकार मानला जात आहे.नेमकी ही घटना काय आहे जाणून घेऊया…
प्राथमिक माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एन वॉर्ड विभागातील स्कायवॉकजवळ एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे कर्मचारी या व्यक्तीचा मृतदेह खाली काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मुंबई पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.
घाटकोपर स्कायवॉकजवळ एका व्यक्तीचा लटकलेला मृतदेह आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे प्राथमिकरित्या आत्महत्येचे असल्याचे दिसते.तसेच आत्महत्या केलेल्या या व्यक्तीजवळ एक बॅग सापडली होती. त्यामध्ये काही तरी सापडेल जेणेकरून त्याची ओळख पटवता येईल असे वाटले होत. पण या बॅगमध्ये काहीच सापडले नाही. ही व्यक्ती निराधार होती. तो पैसे मागून खायचा. ही व्यक्ती स्कायवॉकवरतीच झोपायचा. त्याने आत्महत्या का केली यामागचे कारण समजू शकले नाही.
दुसरीकडे, मुंबईतील भांडुप परिसरात 14 वर्षीय मुलाने अभ्यासासाठी आईच्या टोमण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील भांडुप परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलाने आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, आईने मुलाला त्याच्या अभ्यासासाठी शिवीगाळ केली होती, त्यानंतर रागाच्या भरात त्याने हे कठोर पाऊल उचलले.
आणखी एक धक्कादायक घटना मुंबईत घडली असून मुंबई, गुजरात आणि कर्नाटकमध्ये पसरलेल्या आंतरराज्यीय बाल तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आठ महिलांसह नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. एका महिलेने स्वतःचे मूल पाच लाख रुपयांना विकले. तुरुंगात असलेल्या पतीला जामीन मिळवण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिने आपली मुलगी विकल्याचे महिलेने सांगितले. कर्नाटकातील कारवारमध्ये एका दाम्पत्याला पाच लाख रुपयांना विकलेल्या चार महिन्यांच्या चिमुरडीची सुटका करण्यात आली आहे. यात कर्नाटकातील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि परिचारिका यांचा सहभाग असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुलोचना सुरेश कांबळे (45), मीरा राजाराम यादव (40), योगेश भोईर (37), रोशनी घोष (34), संध्या राजपूत (48), मदिना उर्फ मुन्नी इमाम चव्हाण (44), तैनाज शाहीन चौहान (19) यांचा समावेश आहे. आरोपी शहरातील दादर आणि शिवडी, दिवा, वडोदरा आणि कारवार येथील रहिवासी असून ते लग्नाचे नियोजन, काळजीवाहू आणि रुग्णालयात सहाय्यक म्हणून काम करतात.