Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: सोशल मीडियावरील फोटो, तणावग्रस्त नातं आणि…; ब्रेकअप नंतर अल्पवयीन तरुणाने संपवले आयुष्य

वडाळा परिसरात १७ वर्षीय डिप्लोमा विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ब्रेकअपदरम्यान झालेल्या कथित जातीय वक्तव्यांमुळे तो मानसिकदृष्ट्या खचल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 17, 2026 | 12:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ब्रेकअप आणि कथित जातीय अपमानामुळे मानसिक ताण वाढल्याचा आरोप.
  • प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद.
  • पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू.
मुंबई: मुंबईच्या वडाळा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय डिप्लोमा शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ब्रेकअपदरम्यान कथितरित्या प्रेयसीकडून करण्यात आलेल्या जातीय अपमानास्पद वक्त्यव्यांमुळे तो मानसिकदृष्ट्या तो खचला होता त्यानंतर त्याने हा टोकाचा पाऊल उचलल्याचे आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

काय नेमकं प्रकरण?

ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे. मृत अल्पवयीन हा १७ वर्षांचा आहे. तो दिवा येथे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा शिक्षण घेत होता. तर मृतकाची आई ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात कार्यरत आहे. याप्रकरणी त्याच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अल्पवयीन मुलाची सेवरी परिसरात राहणाऱ्या एका मुलीसोबत काही काळापासून ओळख होती. त्यांनतर त्यांची ही ओळख प्रेमात झाली. मात्र, त्यांच्या या नात्यात सातत्याने तणाव निर्माण होत होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये दोघांमध्ये झालेल्या वादानंतर मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. त्या घटनेनंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

खालच्या जातीचा असल्याचे खुणावले

मुलीने हळूहळू मुलाशी संपर्क टाळण्यास सुरुवात केली. त्याला भेटण्यास नकार देत, त्याच्याशी नाते ठेवण्याची इच्छा नसल्याचे तिने स्पष्ट केल्याचे सांगितले. तसेच, तो खालच्या जातीतला असल्याचे कारण देत तिने त्याच्याशी संबंध ठेवू इच्छित नसल्याचे तिने त्याला सांगितल्याचा गंभीर आरोप आईने केला आहे. या कथित जातीय वक्तव्यांमुळे मुलगा मानसिकदृष्ट्या खचल्याचे आईन सांगितले.

दुसऱ्या मुलासोबतचे फोटो स्टेटसवर

याशिवाय, मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाला सेवरी परिसरात येण्यास मज्जाव केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे दोघांतील संवाद पूर्णपणे बंद झाला. या सर्व घटनांमुळे मुलगा अधिकच नैराश्यात गेला. दरम्यान, मुलीने सोशल मीडियावर इतर मुलांसोबतचे फोटो स्टेटसवर टाकण्यास सुरुवात केल्याने मुलाची मानसिक स्थिती आणखी ढासळल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. हे फोटो जाणीवपूर्वक टाकून त्याला त्रास देण्याचा किंवा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना मुलामध्ये निर्माण झाली होती, असा दावा आईने केला आहे.

कशी उघडकीस आली घटना

१२ फेब्रुवारी सोमवारी त्याची आई कामासाठी गेली असता पीडित मुलगा घरात एकटाच होता. सायंकाळी सुमारे ५ वाजता तिचे त्याच्याशी शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास तिने पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने फोन न उचलल्याने तीला काळजी वाटू लागली. त्यानंतर तिने मुलाच्या एका मित्राला घरी जाऊन पाहण्यास सांगितले. मित्रांनी घराचा दरवाजा ठोठावला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरवाजा तोडून आत बघण्यात आले तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तात्काळ केईएम रूग्णालयात (KEM Hospital) नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गुन्हा दाखल

या प्रकरणी वडाळा पोलीस स्टेशनध्ये विद्यार्थ्याच्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याशिवाय आरोपी प्रेयसीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या अंतर्गतही गुन्हेवार तरतूद केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Beed Crime: बीडमध्ये 30 जणांचा कुटुंबावर हल्ला; लाठ्याकाठ्यांनी मारहाण, तीन महिला जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील वडाळा परिसरात ही घटना घडली.

  • Que: आत्महत्येमागील कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: ब्रेकअपदरम्यान झालेल्या कथित जातीय वक्तव्यांमुळे मानसिक धक्का बसल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: प्रेयसीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Mumbai crime photos on social media tense relationship and a young man ended his life after a breakup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: संतापजनक! सात नराधमनी केला शाळकरी मुलीवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ…
1

Kolhapur Crime: संतापजनक! सात नराधमनी केला शाळकरी मुलीवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ…

Delhi Crime: ऑफिसमध्ये पार्टी, घरी जाण्यासाठी निघाली… काही तासांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; 20 लाखांच्या हुंड्याचा आरोप
2

Delhi Crime: ऑफिसमध्ये पार्टी, घरी जाण्यासाठी निघाली… काही तासांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; 20 लाखांच्या हुंड्याचा आरोप

Uttar Pradesh Crime: बंद खोलीत जळालेला मृतदेह; पोलिस तपासात समोर आलं अंगावर काटा आणणारं सत्य; पत्नीने पेट्रोल…
3

Uttar Pradesh Crime: बंद खोलीत जळालेला मृतदेह; पोलिस तपासात समोर आलं अंगावर काटा आणणारं सत्य; पत्नीने पेट्रोल…

Thane Crime: ऑनलाइन गेमिंगच्या आमिषाने 26 वर्षीय तरुणाला 1.36 कोटींचा गंडा; ठाण्यात सायबर भामट्यांचा मोठा डाव
4

Thane Crime: ऑनलाइन गेमिंगच्या आमिषाने 26 वर्षीय तरुणाला 1.36 कोटींचा गंडा; ठाण्यात सायबर भामट्यांचा मोठा डाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.