मथुरा – मथुरेलगतच्या (Mathura) यमुना एक्सप्रेस वेच्या (Yamuna Express Way) सर्व्हिस रोडवर लाल ट्रॉली बॅगमध्ये सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची (Girls Death Body) ओळख पटवण्यात यश आले आहे. २१ वर्षीय आयुषी यादव असे त्या तरुणीचे नाव असल्याचे मथुरा नगरच्या (Mathura Nagar) अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले. तसेच, तिच्याच वडिलांनी हत्या केल्याचे समोर आले आहे.
आयुषी ही दिल्लीत राहणारी बीसीएची विद्यार्थिनी (BCA Students) होती. तिच्या आई-भावाने पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये येऊन मृतदेहाची ओळख पटवली. गोळ्या झाडून हत्या झाल्याचा संशय आहे. माहिती देताना एसपी सिटी एमपी सिंह म्हणाले की, १७ नोव्हेंबरच्या सकाळी आयुषी घरातून निघून गेली होती. नातेवाईक आयुषीचा शोध घेत होते. आयुषीचे कुटुंब मूळचे सुनर्दी बलूनी गोरखपूरचे आहे.
वडिलांनी मुलगी आयुषीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांची मुलगी आयुषी आपल्याला न सांगता घरातून निघून गेली होती. याचा त्यांना राग आला. आयुषी घरी परतताच तिच्या वडिलांनी तिच्यावर हल्ला करून हत्या केली. ही बाब आरोपी वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत मान्य केली आहे. नितेश यादव यांनी सांगितले की, रागाच्या भरात त्यांनी आपल्या मुलीची हत्या केली. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यांनी मुलगी आयुषीचा मृतदेह रात्रीच एका सुटकेसमध्ये ठेवला आणि नंतर झुडपात फेकून दिला.