Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis PC: नागपुरातील दंगलखोरांवर होणार बुलडोजर कारवाई; फडणवीसांचा थेट इशारा

या घटनेचे जेवढे सीसीटिव्ही फुटेज, खासगी लोकांनी पुरवलेले व्हिडीओज, पत्रकारांकडून मिळालेले चित्रीकरण मिळाले आहे. या चित्रीकरणात जे दंगेखोर दिसत आहेत. त्यांच्या अटकेची कारवाई सुरू झाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 22, 2025 | 05:06 PM
necessary to take strict action against the rioters in Nagpur and give them appropriate punishment

necessary to take strict action against the rioters in Nagpur and give them appropriate punishment

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर: नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी (17 मार्च)  हिंसाचार भडकला होता. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतले.  या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज नागपूरमध्ये भेट देऊन कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला.  या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दंगलखोरांना इशारा दिला आहे.  नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीप्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत दंगलखोरांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला असून, कोणालाही सोडले जाणार नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आवश्यक ठिकाणी बुलडोझर वापरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,  नागपुरात दंगलखोरांनी ज्या प्रकारे हिंसाचार भडकावला, ते पाहता एक उच्च स्तरीय आढवा बैठक घेण्यात आली. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई, याचा आढावा घेण्यात आला. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. पण कबर जाळत अशताना कुराणची आयत असलेली चादर जाळण्यात आली, अशी अफवा पसरवण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी मोठ्या प्रमाणात जमाव जमवण्यात आला. त्या दंगलखोरांनी जाळपोळ केली, दगडफेक केली.लोकांवर हल्ले केले.  पण पोलिसांनी चार-पाच तासतचं दंगल नियंत्रणात आणली.

Devendra Fadnavis Press: दंगलीनंतर पंतप्रधान मोदी नागपूरला येणार का? CM फडणवीस म्हणाले,

या घटनेचे जेवढे सीसीटिव्ही फुटेज, खासगी लोकांनी पुरवलेले व्हिडीओज, पत्रकारांकडून मिळालेले चित्रीकरण मिळाले आहे. या चित्रीकरणात जे दंगेखोर दिसत आहेत. त्यांच्या अटकेची कारवाई सुरू झाली आहे. १०४ जणांची आतापर्यंत ओळख पटवण्यात आली आहे. त्यातील १२ लोकांना अटक कऱण्यात आली आहे. तर इतर जण अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कऱण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘यापेक्षाही जास्त लोकांना अटक करण्यात येणार आहे. जोजो दंगा करताना दिसत आहे. त्या प्रत्येकावर कारवाई होणार आहे. यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेला हवा दिलीत्या सर्वांनाही सह आरोपी बनवल जाणार आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवला आहे, त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. अशा जवळपास ६८ पोस्ट ओळखण्यात आल्या आहेत.

Ajit Pawar On Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यूप्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “हे प्रकरण…”

ज्यांनी ज्यांनी गाड्या फोडल्या, जाळपोळ केली आहे, सार्वजनित मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्या सर्वांना येत्या तीन-चार दिवसात नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच, नागपुरातील निर्बंधामध्ये शिथिलता आणण्यातत येईल. आता जे काही नुकसान झाले आहे ते दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. नुकसानीची सर्व किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडून वसू ल केलं जाईल. त्यांनी ते पैसे भरले नाही तर त्यांची संपत्तीही विकली जाईल, असा कठोर भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. दंगेखोरांची दंगाई पोलीस सहन करणार नाहीत.असंही त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Bulldozer action will be taken against rioters in nagpur fadnavis direct warning nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 05:06 PM

Topics:  

  • Nagpur Violence

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.