Devendra Fadnavis Press: दंगलीनंतर पंतप्रधान मोदी नागपूरला येणार का? CM फडणवीस म्हणाले, "त्या दोऱ्याला..."
नागपूर: राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. याच मुद्द्यावरून नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले. या दंगलीमध्ये काही वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील जखमी झाले होते. या दंगलीतील मास्टरमाईंड म्हणून फहीम खानचे नाव समोर येत आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पोलिस अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्याबाबत भाष्य केले.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हिंसाचार हा नागपूरच्या एका भागात झाली आहे. 80 टक्के नागपूर शांत आहे. ज्या भागात हिंसाचार झाला त्या भागातील परिस्थिती आता शांत झाली आहे. पोलिसांचे त्या भागात नियंत्रण आहे, हळू हळू वातावरण शांत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या दोऱ्याला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.”
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1903356846834061539
नागपूर हिंसाचारातील 104 आरोपींची ओळख झाली आहे. 92 आरोपीना अटक करण्यात आली आहे. शेवटच्या दंगेखोराला अटक होत नाही टॉवर ही कारवाई सुरूच राहणार आहे. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल केले जातील. सोशल मिडियावर चुकीच्या पोस्ट टाकल्याने हा हिंसाचार झाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपूर हिंंसाचार ‘नियोजनबद्ध कट
नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार एमडीपी पक्षाचा शहराध्यक्ष फाईम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, एमडीपी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शेहजाद खान यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेच्या पोलिस तपासातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नागपुरात सोमवारी उफाळलेला हिंसाचार हा नियोजनबद्ध कट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलीस आणखी काही संशयितांची चौकशी करत आहेत.
Nagpur Violence: नागपूर हिंंसाचार ‘नियोजनबद्ध कट’; पोलीस तपासात मोठी माहिती उघड
मिळालेल्या माहितीनुसार,नागपूर हिंसाचार प्रकरणी फाईम खान याच्यासह एमडीपी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शेहजाद खान यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिस तपासात या हिंसाचाराचा नियोजनबद्ध कट असल्याचे स्पष्ट झाले असून, आणखी काही संशयितांची चौकशी केली जात आहे.
नागपूरमधील महाल आणि हंसापुरी या भागात सोमवारी (17 मार्च) रात्री मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचाराचे नियोजन सोमवारी सकाळीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हमीद इंजिनियरने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुजाहिद्दीनसाठी आणि युद्धग्रस्त गाझा भागातील नागरिकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचे आवाहन केले होते. यासंबंधीचे काही पुरावेही सायबर पोलिसांच्या हाती लागले आहेत.