
Dating App Story: "लग्नासाठी कॅनडाहून भारतात आली, पण..." डेटिंग ॲपवरील प्रेमाचा भयंकर अंत; तरुणाने दिला लग्नास स्पष्ट नकार!
ही घटना राजस्थानमधील कोटपूतली-बहरोड जिल्ह्यातील नीमराना येथे घडली आहे. आरोपी तरुणाचे नाव नितीन असून तो मूळचा हरियाणातील पानीपत येथील रहिवासी आहे आणि एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. नीमराना पोलीस ठाण्याचे अधिकारी सुरेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे वर्षभरापूर्वी पानीपत येथील नितीन याची ओळख एका ऑनलाइन डेटिंग ॲपद्वारे कॅनडातील या महिलेशी झाली होती. हळूहळू दोघांमधील संवाद वाढला, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करण्यास सहमतीही दर्शवली. याच विश्वासावर आणि लग्नाच्या अपेक्षेने संबंधित कॅनेडियन महिला ११ नोव्हेंबर रोजी टूरिस्ट व्हिसावर दिल्ली विमानतळावर दाखल झाली.
दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर नितीन स्वतः तिला घेण्यासाठी गेला आणि तेथून तिला नीमराना परिसरातील आपल्या मावशीच्या फ्लॅटवर घेऊन आला. ही महिला दोन दिवस नितीनसोबत याच सोसायटीतील फ्लॅटवर राहिली. यादरम्यान, जेव्हा लग्नाची बोलणी पुढे सरकली आणि महिलेचे वास्तविक वय सुमारे ६१ वर्षे असल्याची माहिती समोर आली, तेव्हा तरुणाने वयात खूप मोठे अंतर असल्याचे कारण देत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.
हेही वाचा: अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले
हजारो किलोमीटरवरून लग्नाची स्वप्ने घेऊन भारतात आलेल्या महिलेसाठी तरुणाचा हा निर्णय मोठा धक्का देणारा ठरला. यावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची आणि वाद सुरू झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून संबंधित विदेशी महिलेने तत्काळ कॅनडा दूतावासाशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. दूतावासाकडून अलर्ट मिळताच नीमराना पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले. सध्या पोलिसांनी नितीनला ताब्यात घेतले असून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
Ans: ऑनलाइन डेटिंग ॲपवरील प्रेमामुळे लग्न करण्यासाठी ती कॅनडाहून भारतात आली होती.
Ans: महिलेचे वास्तविक वय सुमारे ६१ वर्षे असल्याचे समोर आल्यावर, वयातील मोठ्या अंतराचे कारण देत तरुणाने लग्नास नकार दिला.
Ans: तरुणाने नकार दिल्यानंतर महिलेने कॅनडा दूतावासाशी संपर्क साधला; दूतावासाच्या माध्यमातून माहिती मिळताच नीमराना पोलिसांनी आरोपी तरुण नितीनला ताब्यात घेतले