संग्रहित फोटो
शुक्रवारी पोलिस नियंत्रण कक्षाला संजय गांधी नगर परिसरात काही मुलांनी एका तरुणावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून जखमी तरुण रोहित प्रभाकर गजघाटे (वय २३, रा. संजय गांधी नगर क्रमांक १, अमरावती) याच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली.
प्राथमिक माहितीच्या आधारे हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन अल्पवयीन आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, गोपनीय खबऱ्यामार्फत हे तिन्ही संशयित किशोर नगर परिसरात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी किशोर नगर परिसरात छापा टाकून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तिन्ही अल्पवयीनांना पुढील तपासासाठी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अतुल वर व दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली एपीआय दशरथ आडे यांच्यासह गजानन सोनुने, सचिन माकोडे, सुनील लासुरकर, दीपक सुंदरकर, गजानन ठेवले, आस्तिक देशमुख, मनोज ठोसर, मंगेश परिमल आणि सचिन बहाले यांनी केली.
हे सुद्धा वाचा : मेहुण्यानेच जावयाचा काढला काटा, भर चौकात रक्तरंजित थरार; नागपुरातील घटनेनं खळबळ
Ans: अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधी नगर परिसरात रोहित प्रभाकर गजघाटे (वय २३) याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.
Ans: शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे किशोर नगर परिसरात छापा टाकून तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले.
Ans: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून तिन्ही अल्पवयीन आरोपींनी रोहित गजघाटे याच्यावर चाकूने हल्ला केला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.






