Crime: प्रवाशाच्या पिशवीतून पावणेदोन लाखांची रोकड चोरीला; विमानतळावर नेमके काय घडले?
पुणे: विमान प्रवाशाच्या पिशवीतून १ लाख ८० हजारांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली.याप्रकरणी विमानतळ पोलिसांत चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार निगडीतील यमुनानगर भागात राहायला आहेत. ते कामानिमित्त दिल्लीला गेले होते. रविवारी (१२ जानेवारी) सायंकाळी ते दिल्लीहून विमानाने पुण्याकडे निघाले.
दिल्ली मेट्रो स्टेशन परिसरात प्रवाशाने पिशवीची पाहणी केली. पिशवीत ठेवलेली १ लाख ८० हजारांची रोकड व्ववस्थित ठेवल्याची खात्री केल्यानंतर त्यांनी रोकड असलेली पिशवी विमानतळावर दिली. विमानातील सामान ठेवण्याच्या कप्प्यात पिशवीत जमा करण्यात आली. लोहगाव विमानतळावर ते रात्री उतरले. विमान उतरल्यानंतर त्यांनी रात्री बाराच्या सुमारास पिशवी ताब्यात घेतली. तेव्हा पिशवीत ठेवलेली रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार एस. एल. जामदार तपास करत आहेत.
कात्रजमध्ये पेट्रोल पंपावरील कामगाराला दांडक्याने मारहाण
कात्रज-कोंढवा रस्त्यावर पेट्रोल पंपावरील कामगाराला धमकावून चोरट्यांनी त्यांच्याकडील त्याच्याकडील साडेतीन लाखांची रोकड लूटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत कामगार जखमी झाला आहे. याबाबत सलीम सिकंदर शेख (वय ३१, रा. भैरवनाथ मंदिरासमोर, खडकवासला) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी दांडक्याने मारहाण केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, शेख एका पेट्रोल पंपावर कामाला आहेत. दुपारी साडेचारच्या सुमारास ते पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड घेऊन बँकेत भरणा करण्यासाठी निघाले होते. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊलीनगर परिसरात तीन चोरट्यांनी त्यांना अडवले. लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. डोक्यात दांडके बसल्याने ते जखमी झाले. झटापटीत चोरट्यांनी शेख यांच्याकडील रोकड ठेवलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. शेख यांनी प्रसंगावधान राखून पिशवी घट्ट पकडली. त्यांचा आरडाओरडा ऐकून नागरिक तेथे जमा झाले. नागरिक जमा झाल्याचे पाहताच चोरटे पसार झाले.
हेही वाचा: कात्रजमध्ये पेट्रोल पंपावरील कामगाराला दांडक्याने मारहाण; साडेतीन लाखांची रोकड लूटण्याचा प्रयत्न
पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यात सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.