
crime (फोटो सौजन्य: social media)
माल पुरवण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याची फसवणूक; तब्बल 6.25 कोटींना गंडा
नेमकं घडलं काय?
सुजल ओसवाल हा सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका नामांकित खासगी कंपनीमध्ये कार्यरत होता. कामावर असताना तो कंपनीच्या कॅन्टीनमधील स्वच्छतागृहामध्ये गेला. तिथे त्याने मोबाईल चार्जरच्या केबलचा साहाय्याने गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना मंगळवारी (६ जानेवारी) पहाटे उघडकीस आली.
आत्महत्या करण्यापूर्वी उचलले टोकाचे पाऊल
सुजलने टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या नातेवाईकांना मोबाईलवर एक मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये त्याने ऑनलाईन सत्ता आणि बेटिंगच्या आहारी गेल्याचं कबुली दिली. ऑनलाइन जुगारात मोठ्या प्रमाणावर पैसे हरला त्यामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर झाला. यामुळे तो नैराश्यात गेला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले. उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराची नोकरी करत असतानाही केवळ जुगाराच्या व्यसनामुळे एका २४ वर्षीय तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने आयटी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी सुजलचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ
पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…
पुण्यातून हत्येची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन सतरा वर्षाच्या मुलाचं अपहरण करून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. आरोपींनी मुलाला सोशल मीडिया इन्स्टाग्रामवरती एका मुलीच्या माध्यमातून पीडित मुलाला कात्रज परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर त्याला खेड शिवापूर येथे नेले आणि त्याच्यावर दगड व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर दोन विधिसंघर्षित मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. हत्या झालेल्या मुलाचे नाव अमनसिंग सुरेद्रसिंह गच्चड (वय १७ वर्षे, रा. टिगरेनगर लेन नं १४, पुणे इन्टरनॅशनल स्कूलजवळ, विश्रांतवाडी) असे आहे.
Ans: मंगळवारी पहाटे, हिंजवडी आयटी पार्कमधील कंपनीच्या कॅन्टीनमध्ये.
Ans: ऑनलाइन जुगार आणि बेटिंगमुळे झालेलं आर्थिक नुकसान व कर्ज.
Ans: सुजल विनोद ओसवाल (वय 24), सॉफ्टवेअर इंजिनिअर.