संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सरपंच संघटना एकवटली
बीड: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वाल्मिक कराड हाच या देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार असल्याचे म्हटले जात आहे. पण वाल्मिक कराड सध्या फरार आहे. सीआडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून 150 हून अधिक पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहे. तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसा या प्रकरणातील खुलासे समोर येऊ लागले आहेत. अशातच पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड फरार आहे. विशेष म्हणजे तो मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा माणूस असल्याचा आरोपही देशमुख यांच्या कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. एकीकडे सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना दुसरीकडे बीड पोलीसदेखील या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या तपासात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
आर्थिक तूट जात आहे नियंत्रणाबाहेर; देशाला आर्थिक सुधारणांच्या दुसऱ्या फेरीची गरज
वाल्मिक कराड महाराष्ट्रात असल्याचे तपासातून समोर आले आहे. वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआयडीचे विशेष पथकही रवाना करण्यात आले आहे. आजपासून सीआयडीच्या आणखी चार टीमही कराडच्या शोधासाठी पावण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी शक्यता आहे.
याशिवाय आतापर्यंत सीआयडीने या प्रकरणात जप्तीही सुरू केली आहे. सीआयडीकडून या प्रकरणात खंडणी, हत्या, अॅट्रोसिटी प्रकऱणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली. यात वाल्मिक कराडची 100 हून अधिक बँक खाती सील करण्यात आली आहे. म्हणजेच आता या खात्यांमधून वाल्मिक कराडला पैशांचे कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. यासोबत त्यांची आणखी कोणकोणत्या बँकांमध्ये खाती आहेत. त्याचाही शोध सुरू आहे. तसेच या जप्तीसंदर्भात उच्च न्यायालयाकडे पत्र सादर करण्यात आले आहे.
Yearly Horoscope 2025: नव्या वर्षात कोणाला मिळणार नोकरी, घर, प्रेम?
रविवारी वाल्मिक कराड याची पत्नी मंजिली कराड यांची सीआयडी पथकाने केज पोलिस ठाण्यात एक तास चौकशी केली. आतापर्यंत त्यांची तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आणि वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक यांची देखील चौकशी करण्यात आली. तसेच चार ते पाच महिलांना बीड शहर पोलीस ठाण्यात सीआयडीने चौकशीसाठी बोलवले होते. तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. अद्याप त्यांची नावे समोर आली नसली, तरी खंडणी प्रकरणातील आरोपीच्या जवळचे असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता पोलिस आणि सीआयडीकडून तपासाची सूत्रे वेगाने फिरताना दिसत आहे.
बीडमधील या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आता अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच, ज्या ज्या नेत्यांची आणि धनदांडग्यांची बंदुकी-पिस्तुले दाखवीत छायाचित्रे आहेत त्या सर्वांचे शस्त्र परवांनेही रद्द करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
आता पोषण आहाराचे होणार ऑडिट; सनदी लेखापाल संस्थेचीही होणार नियुक्ती