Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: हातावर बदामाच्या आकारातील त्या टॅटूमुळे समोर आले सत्य; धावत्या तपोवन एक्स्प्रेससमोर मायलेकाने घेतले टोकाचे पाऊल

मुकुंदवाडी स्थानकावर धावत्या रेल्वेसमोर मायलेकाने घेतलेल्या टोकाच्या पावलाने खळबळ उडाली. मृत महिलेची ओळख पटत नव्हती; मात्र हातावरील एका टॅटूने अखेर रहस्य उलगडले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 07, 2026 | 10:31 AM
Crime News: हातावर बदामाच्या आकारातील त्या टॅटूमुळे समोर आले सत्य; धावत्या तपोवन एक्स्प्रेससमोर मायलेकाने घेतले टोकाचे पाऊल

Crime News: हातावर बदामाच्या आकारातील त्या टॅटूमुळे समोर आले सत्य; धावत्या तपोवन एक्स्प्रेससमोर मायलेकाने घेतले टोकाचे पाऊल

Follow Us
Follow Us:
  • अवघ्या दीड महिन्यांपूर्वी पतीचे निधन
  • नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज
  • हातावरील टॅटूमुळे मृत महिलेची ओळख पटली
छत्रपती संभाजीनगर: मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात धावत्या तपोवन एक्स्प्रेससमोर चार वर्षांच्या मुलासह महिलेने उडी घेत आत्महत्या केल्याच्या घटनेतील मायलेकाची ओळख अखेर पटली आहे. महिलेच्या हातावर बदामाच्या आकारात गोंदवलेल्या ‘अक्षय’ या नावाच्या टॅटूमुळे पोलिसांना तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला. रविवारी नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात जाऊन मृतदेहांची पाहणी केल्यानंतर मृत महिला पल्लवी अक्षय बनकर (२६) आणि मुलगा दक्ष अक्षय बनकर (४, दोघे रा. शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी) असल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी (५ सप्टेंबर) दुपारी साडेदोनच्या सुमारास नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरातून जात असताना ही घटना घडली. महिला आपल्या चिमुकल्यासह रेल्वेसमोर गेल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले.

हातावरील टॅटू ठरला महत्त्वाचा धागा

घटनेनंतर मृत महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. महिलेच्या हातावर बदामाच्या आकारात ‘अक्षय’ असे नाव गोंदवलेले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हे नाव तिच्या कुटुंबीयांशी संबंधित असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला.पोलिसांनी विविध माध्यमातून महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रविवारी दुपारनंतर नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात येऊन मृतदेहांची पाहणी केली. त्यानंतर मृत महिला पल्लवी बनकर आणि तिचा चार वर्षांचा मुलगा दक्ष असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा: Samruddhi Mahamarg Robbery: समृद्धी फॉर्च्युनर लूटप्रकरणात पोलिसांचा करेक्ट कार्यक्रम; वेशांतर करून चौघांना पकडले

पतीच्या निधनानंतर नैराश्य?

पोलिसांच्या माहितीनुसार, पल्लवी यांच्या हातावरील ‘अक्षय’ हे नाव त्यांच्या पतीचे होते. अक्षय बनकर यांचे सुमारे दीड महिन्यांपूर्वी निधन झाले होते. पतीच्या निधनामुळे पल्लवी मानसिकदृष्ट्या खचल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी मुलासह हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेमागील नेमकी कारणे आणि परिस्थितीचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

Web Title: Crime news almond shaped tattoo on the hand reveals the truth mother and son took the extreme step in front of the moving tapovan express

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 10:31 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.