Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: सांगलीत अंगावर काटा आणणारा अपघात; रस्त्यावर पडलेल्या तरुणाच्या अंगावरून मर्सिडीज गेली अन्…

मुसळधार पावसात गजबजलेल्या रस्त्यावर अचानक एक तरुण कोसळला आणि पुढच्याच क्षणी काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार घडला. भरधाव आलेली मर्सिडीज त्याच्या अंगावरून गेली; सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेने सांगलीत खळबळ उडाली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 07, 2026 | 03:14 PM
Crime News: सांगलीत अंगावर काटा आणणारा अपघात; रस्त्यावर पडलेल्या तरुणाच्या अंगावरून मर्सिडीज गेली अन्...

Crime News: सांगलीत अंगावर काटा आणणारा अपघात; रस्त्यावर पडलेल्या तरुणाच्या अंगावरून मर्सिडीज गेली अन्...

Follow Us
Follow Us:
  • अपघाताचे थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद
  • एसटी स्टँडसमोर थरारक अपघात
  • पावसात रस्त्यावर पडणे ठरले जीवघेणे
सांगली: मुसळधार पावसात गजबजलेल्या रस्त्यावर तोल जाऊन पडलेल्या तरुणाच्या अंगावरून भरधाव मर्सिडीज कार गेल्याची धक्कादायक घटना सांगली शहरातील एसटी स्टँडसमोर घडली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या जयंत पवार (रा. कार्वे, ता. कराड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भरपावसात रस्त्यावर कोसळला

मिळालेल्या माहितीनुसार, जयंत पवार हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सांगली एसटी स्टँड परिसरातून जात होते. त्यावेळी शहरात मुसळधार पाऊस सुरू होता. जयंत हे मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. चालत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते गजबजलेल्या रस्त्यावरच कोसळले. जयंत रस्त्यावर पडलेले असतानाच त्याच मार्गावरून एक मर्सिडीज कार वेगाने येत होती. पावसाची तीव्रता आणि रस्त्यावरील परिस्थितीमुळे चालकाच्या लक्षात आले नाही की, रस्त्यावर तरुण पडलेला आहे. त्यामुळे   कार थेट जयंत यांच्या अंगावरून गेली. काही क्षणांत घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये  खळबळ उडाली.

हेही वाचा: Shirur Crime: बसचालकाला अडवले, मारहाण केली अन् पैसे लुटले;शिरूर पोलिसांचा २४ तासांत करेक्ट कार्यक्रम

नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले

अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या जयंत यांना तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, त्यांच्या शरीराला गंभीर अंतर्गत दुखापती झाल्याने प्रकृती चिंताजनक बनली. आणि उपचारादरम्यान त्यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे  अखेर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जयंत पवार यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे.

हेही वाचा: Crime News: हातावर बदामाच्या आकारातील त्या टॅटूमुळे समोर आले सत्य; धावत्या तपोवन एक्स्प्रेससमोर मायलेकाने घेतले टोकाचे पाऊल

सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

या संपूर्ण अपघाताचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. जयंत रस्त्यावर कोसळल्यानंतर काही क्षणांतच भरधाव मर्सिडीज त्यांच्या अंगावरून जात असल्याचे या फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांकडून अपघाताच्या परिस्थितीचा तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेची माहिती घेतली जात आहे की, कारचा वेग, चालकाची भूमिका आणि अपघात नेमक्या कोणत्या परिस्थितीत घडला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title: Crime news spine chilling accident in sangli a mercedes ran over a young man lying on the road and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 03:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.