Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime news: गाय घेऊन जाताना रस्त्यात अडवलं; मारहाणीसह अपमानास्पद कृत्य केल्याचा गंभीर आरोप

लहान बाळाला गावरान गाईचे दूध मिळावे म्हणून गाय आणि कालवड खरेदी करून घरी निघालेल्या कुटुंबावर रस्त्यातच संकट ओढावले. वाहन अडवून मारहाण केल्यासह अपमानास्पद कृत्य केल्याचा गंभीर आरोप असून, याप्रकरणी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 10, 2026 | 03:36 PM
Crime news: गाय घेऊन जाताना रस्त्यात अडवलं; मारहाणीसह अपमानास्पद कृत्य केल्याचा गंभीर आरोप

Crime news: गाय घेऊन जाताना रस्त्यात अडवलं; मारहाणीसह अपमानास्पद कृत्य केल्याचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • गाय-कालवड घेऊन जाताना वाहनचालकाला मारहाण
  • अपमानास्पद कृत्य केल्याचा फिर्यादीचा दावा
  • २१ हजार रुपये हिसकावून १५ आरोपी फरार
 

श्रीगोंदा (अहिल्यानगर): घरातील लहान बाळाला गावरान गाईचे दूध मिळावे म्हणून गाय आणि कालवड खरेदी करून घरी घेऊन जात असलेल्या व्यक्तीला रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार शिवारात घडल्याचे समोर आले आहे. विजय शेळके आणि वाहनचालक महेश जाधव यांना काठ्या आणि लोखंडी टामीने मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, १५ ही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

गाय-कालवड घेऊन जाताना अडवले

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास टाकळी लोणार ते पिसोरे खांड रस्त्यावर ही घटना घडली. विजय शेळके आणि वाहनचालक महेश जाधव हे गाय आणि कालवड घेऊन गुणवडीच्या दिशेने जात होते. त्यावेळी काही जणांनी त्यांचा पाठलाग करून वाहन अडवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच वाहन थांबवल्यानंतर आरोपींनी विजय शेळके आणि महेश जाधव यांना काठ्या तसेच लोखंडी टामीने मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

हेही वाचा: Pune:“तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस?” म्हणत MPSC विद्यार्थ्याचे अपहरण; गाडीत कोंबले, पुढे जे घडलं ते…

२१ हजार रुपये घेतल्याचा आरोप

मारहाणीदरम्यान विजय शेळके यांच्या खिशातील २१ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेनंतर शेळके यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. फिर्यादी विजय शेळके यांच्या म्हणण्यानुसार, घरातील लहान बाळाला गावरान गाईचे दूध मिळावे म्हणून त्यांनी टाकळी लोणार येथील पंडित दरवडे यांच्याकडून व्यायलेली कालवड असलेली गावरान गाय खरेदी केली होती. गाय आणि कालवड घेऊन ते गुणवडीला जात असताना हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.

अपमानास्पद कृत्य केल्याचा गंभीर आरोप

या प्रकरणातील तक्रारीत शेळके यांच्यासोबत अपमानास्पद वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांचे कपडे काढून अपमान केल्याचे तसेच पाण्याच्या बाटलीत लघवी करून ती जबरदस्तीने पाजल्याचे फिर्यादीत नमूद असल्याचे समोर आले आहे. या कथित प्रकाराचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढल्याचाही दावा करण्यात आला आहे. हे आरोप पोलिस तपासाचा विषय आहेत.

हेही वाचा: Mumbai Crime: आधी घराचे भाडे भरले, नंतर अचानक गायब; १९ जणांची कोट्यवधींची फसवणूक

१५ ते २० जणांवर गुन्हा

या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी १५ आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे. घटनेमागील नेमके कारण, सहभागी व्यक्तींची भूमिका आणि कथित मारहाणीबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कायदा हातात घेऊन नागरिकांना अडवणे किंवा मारहाण करण्याच्या प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून तक्रारीतील आरोपांची चौकशी करून पुढील कारवाई केली जात आहे.

Web Title: Crime news waylaid while transporting a cow serious allegations of assault and humiliating treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 03:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.