curfew imposed in jalgaon guardian minister village tense silence due to stone pelting incident case has been registered nrvb
जळगाव : तालुक्यातील पाळधी गावात (Paldhi Village) मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक (Stone Pelting) झाली. एका धार्मिक स्थळाजवळून काही जण जात असताना अचानक दगडफेक झाली. त्यात पोलिसांसह तीन जण जखमी (Injured) झाले. हल्लेखोरांनी तीन वाहने तसेच काही दुकानांची तोडफोड केली (Shops Were Vandalized). या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर काही जणांनी पाळधी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. हे प्रकरण पोलिसांकडून हाताळले जात लावले. असतानाच, गावात दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी पोलिसांचे वाहन तसेच पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे यांच्या वाहनाची देखील तोडफोड केली. या घटनेची माहिती जळगाव पोलिसांना (Jalgaon Police) मिळाल्यानंतर जळगाव, धरणगाव व चोपडा येथून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला होता.
[read_also content=”मी सुशिक्षित आहे, माझे निर्णय स्वतः घेईन…हे ऐकून वडील संतापले, अन् रागाच्या भरात… https://www.navarashtra.com/crime/crime-news-kasganj-lecturer-father-shot-himself-after-killing-daughter-in-uttar-pradesh-nrvb-379341.html”]
घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, ऋषीकेश रावले, एलसीबी निरीक्षक किसनराव नजन पाटील हे पथकासह पोहचले आहेत. पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि आरसीपी पथक बोलाविले आहेत. संशयितांची धरपकड रात्रीच करण्यात आली असून गावात शांतता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले आहे.
शेख सलीम शेख गणी कुरेशी याने त्याच्या ताब्यातील ट्रक (नंबर माहित नाही) हा पोलिसांच्या अंगावर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात पोकाँ. जितेश नाईक हे जखमी झाले आहेत. तसेच पोलीस शासकीय कर्तव्य करत असताना पोलिसांना धरुन ठेवून त्याच्यांशी हुज्जत घालत मारहाण करून, जखमी करून शासकीय कामात अळथडा आणला.
[read_also content=”आजचे राशीभविष्य २९ मार्च २०२३, ‘ही’ रास आज व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होऊन तिची नाव व कीर्ती व्यापक होईल; वाचा आजचा दिवस असा जाईल https://www.navarashtra.com/lifestyle/today-daily-horoscope-29-march-2023-leo-will-become-commercially-successful-and-her-name-and-fame-will-spread-read-rashibhavishya-in-marathi-nrvb-379243.html”]
१) राहुल तुकाराम पाटील, २) राकेश लोहार, ३) विकी राजेंद्र बिढे, ४) शेखर अशोक चौधरी, ५) चेतन भरत चौधरी, ६) योगेश अशोक चौधरी, ७) भुपेश रविंद्र पाटील,८) रोहित कुमावत, ९) मिहीर प्रल्हाद बिढे यांच्या सोबत ३० ते ४० लोक तसेच १) शेख दानिश शेख मुस्ताक, २) सलीम युनुस पिंजारी, ३) जाफर शेख जब्बार,४) शेख कय्युम शेख मेहमुद मन्यार, ५) फरजान खान अरिफ खान, ६) शेख नदिन शेख गफ्फार, ७) शेख नजामोद्दीन शेख उस्मोद्दीन, ८) सुलतान खान | आयुब खान, ९) जुबेर शेख हकिम, १०) अजरोद्दीन शेख अमिनोद्दीन, ११) साबीर सलीम मन्यार, १२) आदिल जब्बार शेख, १३) मोहीन शेख मुस्ताक, १४) अक्रमखान आयुबखान, १५) शेख परवेज शेख मुस्ताक, १६) शेख अजगर शेख निसार, १७) शाबीर युनुस पिंजारी, १८) मुसद्दीन शेख खलील शेक, १९) शेख तोसिफ शेख रफिक, २०) जहागीर शेख गफ्फार, २१) शेख शोहेब शेख रफिक, २२) शेख शाखीर शेख गफ्फार, २३) हर्षद शेख रफिक, २४) रिजवान शेख सलीम, २५) निशार शहा मस्तान शहा, २६) अस्लम आयुब खान कुरेशी, २७) जहागीर शहा सुपडु शहा, २८) सुलतान शहा मस्तान शहा, २९) शेख रिजवान शेख रशिद, ३०) आवेद खान असलम खान, ३१) शेख शकिल शेक अजिज, ३२) महोम्मद वसिम मोहम्मद कलीम, ३३) इद्रिस शेख शब्बीर, ३४) एहसान शेख सत्तार, ३५ ) ईसाक अहमद शब्बीर अहमद, ३६) ऐजाज अहमद शब्बीर ३७) नासीर बशीर पिंजारी ३८) भिकन कालु भाट ३९) लखन गुलशन भाट ४०) सलमान रहेमान फकिर ४१ ) जावेद शहा रमजान शहा ४२) शबीर खान महोम्मद खान ४३) मुस्ताक शेख फकिरा ४४) शहारुख रहेमान फकिर ४५) आवेश मोहसीन देशमुख ४६) जावेद उर्फ इम्रान पठाण ४७) अफताफ शेख ४८)भोकऱ्या पठाण भंगारवाला ४९) छोटु कुरेशी ५०) भिकन कुरेशी ५१) युनुस शेख ५२) आजीम रबानी देशपांडे ५३) नयीम गणी देशपांडे ५४) बाबा मुस्ताक देशपांडे ५५) निसार गुलाब देशपांडे ५६) आरिफ रफिक देशपांडे ५७) भुऱ्या बारिक शेख (प्लॉट भाग) ५८) पप्पु रफिक देशपांडे ५९) शेख सलीम शेख हुसेन ६०) समीर देशपांडे ६१) जाबीर पिंजारी ६२) वसिम उर्फ बाबु शेख ६३) जब्बार शेख (मेंम्बर) असे सर्व (रा. पाळधी ता.धरणगाव) व इतर २० ते ३० जण नाव-गाव माहित नाही, अशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ४५ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोहेकॉ विजय चौधरी यांनी फिर्याद दिली आहे.