Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करताय तर सावधान! सायबर पोलिसांनी दिल्या सुरक्षेच्या सूचना

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवली नाही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याचा गैरफायदा आता सायबर चोरट्यांकडून केला जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 08, 2025 | 02:54 PM
Cyber ​​thieves attempt fraud while applying online for HSRP number plate

Cyber ​​thieves attempt fraud while applying online for HSRP number plate

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्य सरकारकडून वाहनांच्या नंबर प्लेटबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुमचे वाहन 2019 पूर्वीचे असेल तर ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य असेल. ही नंबर प्लेट लावण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 असणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत नंबर प्लेट बसवली नाही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मात्र याचा गैरफायदा अनेकांनी उठवण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील अनेकांची एचएसआरपी नंबर प्लेट बनवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाली आहे.

पुणे शहरामध्ये HSRP नंबर प्लेटसाठी बनवण्यासाठी वाहनचालकांची घाई सुरु आहे. याचाच गैरफायदा काही सायबर गुन्हेगार उचलत असल्याचे दिसत आहे. HSRP नंबर प्लेटसाठी बनवण्यासाठी अर्ज करताना नागरिकांच्या फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. सायबर गुन्हेगार बनावट वेबसाईट बनवून लोकांकडून पैसे उकळत आहेत. एप्रिल महिन्यानंतर दंडात्मक कारवाईची भीती असल्यामुळे अनेक वाहन चालक हे सायबर गुन्हेगारांच्या विळख्यात अडकत आहेत. याबाबत पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांकडे दोन तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. यामुळे पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करुन अनेकांनी पैसे देखील भरले. मात्र तरी देखील लोकांना HSRP मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. अशा पद्धतीचे गुन्हे होऊ लागल्याने  पोलिसांनी लोकांना सावध केले आहे. पिंपरी चिंचवड सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रवि किरण नाळे यांनी सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यामध्ये न अडकण्याचे आवाहन लोकांना केले आहे.

पिंपरी चिंचवड सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रवि किरण नाळे यांनी फसवणुकीपासून वाचण्यासाठी अधिकची माहिती दिली. ते म्हणाले, “आम्हाला आतापर्यंत दोन तक्रारी मिळाल्या आहेत. एका व्यक्तीचे 1500 रुपये तर दुसऱ्या व्यक्तीचे 4 हजार रुपये बुडाले आहेत. गुन्हेगार वाहतूक विभागाच्या वेबसाईटसारखीच बनावट वेबसाईट बनवतात. त्यामुळे लोकांची फसवणूक होते. लोक इंटरनेटवर वाहतूक विभागाची वेबसाईट शोधतात. त्यावेळी त्यांना बनावट वेबसाईट दिसते. ते त्यावर क्लिक करतात आणि फसले जातात, असे मत त्यांन व्यक्त केले.

लोकांची फसवणूक होऊन त्यांच्याकडून पैसे देखील घेतले जातात असे त्यांनी नमूद केले. एका व्यक्तीने तर सर्चमध्ये दिसलेल्या पहिल्याच वेबसाईटवर क्लिक केले. त्याने HSRP साठी लागणारी सर्व माहिती भरली. UPI द्वारे पैसेही भरले. पण त्याला काहीच कन्फर्मेशनचा मेसेज आला नाही आणि त्याचे पैसे बुडाले, अशी माहिती नाळे यांनी दिले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

राज्य सरकारच्या निर्णय आणि त्यासाठी दिलेला अल्पवधी यामुळे वाहन चालकांनी घाई केली आहे. यामध्ये वाहन चालकांची मोठी फसवणूक होत आहे. त्यामुळे अधिकृत वेबसाईटवरुनच अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. HSRP म्हणजे High-Security Registration Plate. ही नंबर प्लेट खास असते. ती सहज काढता येत नाही. त्यामुळे गाडी चोरीला गेल्यास किंवा इतर गुन्ह्यांमध्ये गाडी वापरली गेल्यास, गाडी शोधायला मदत होते. यामुळे सर्व गाड्यांना ही नंबर प्लेट लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Web Title: Cyber thieves attempt fraud while applying online for hsrp number plate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Cyber Fraud
  • HSRP
  • Pune Cyber Fraud

संबंधित बातम्या

Mumbai Cyber Fraud: आता चोरांनी थेट हद्दच केली पार! सरन्यायाधीशांच्याच नावाचा केला वापर; महिलेची ३ कोटी ७५ लाखांची ऑनलाइन लूट
1

Mumbai Cyber Fraud: आता चोरांनी थेट हद्दच केली पार! सरन्यायाधीशांच्याच नावाचा केला वापर; महिलेची ३ कोटी ७५ लाखांची ऑनलाइन लूट

Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव
2

Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव

Crime News: व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ५६ लाखांची फसवणूक; 28 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
3

Crime News: व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ५६ लाखांची फसवणूक; 28 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

Nashik Crime: ऑनलाईन हॉस्पिटलचा नंबर शोधणे पडलं महागात! सायबर भामट्यांनी नाशिकमध्ये दोन जणांना लावला लाखांचा चुना
4

Nashik Crime: ऑनलाईन हॉस्पिटलचा नंबर शोधणे पडलं महागात! सायबर भामट्यांनी नाशिकमध्ये दोन जणांना लावला लाखांचा चुना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.