कॉंग्रेस पक्षाचे नेते सहदेव बेटकर यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्ष हे पक्ष आणि संघटन मजबूतीच्या मागे लागले आहेत. उद्धव ठाकरे यांचा गट देखील यासाठी प्रयत्न करत आहेत. ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या मित्रपक्षाला शह देत रत्नागिरीतील मोठा नेत्याचा पक्षप्रवेश करुन घेतला आहे.
कॉंग्रेस पक्षाचे नेते सहदेव बेटकर यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. गुहागरमधील महत्त्वपूर्ण नेते मानल्या जाणाऱ्या सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी देखील ते शिवसेनेमध्ये होते. आता कॉंग्रेसमधून त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश करुन घरवापसी केली आहे. उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सहदेव बेटकर यांच्या शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षप्रवेशासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर ह्यांचा जाहीर पक्षप्रवेश । प्रमुख उपस्थिती – पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे । मातोश्री, मुंबई – #LIVE https://t.co/tGfNJgTcyW
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 8, 2025
यावेळी खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले की, “या पक्षप्रवेशावेळी सर्व कोकणचे सुपुत्र येथे उपस्थित आहेत. यामध्ये आता आपल्या सहदेवांची भर पडली आहे. महाभारतातील तीन प्रमुख पात्र येथे उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे श्रीकृष्ण, आणि संजय व सहदेव देखील आहेत. महाभारतामध्ये सहदेव हे फार महत्त्वाचं पात्र होतं. धर्मराज्याच्या अत्यंत जवळच कोण असेल कर ते सहदेव होते. आता सहदेव श्रीकृष्णाच्या जवळ आला आहे. सहदेवांच्या येण्याने कुरुक्षेत्रावरील हे नवीन महायुद्ध सुरु झाले आहे हे युद्ध आपण जिंकणार आहोत. कोकणातील युद्ध आपण जिंकणार आहोत. सहदेवांना सांगितलं आहे की हे शेवटचे मैदान, आता मैदान बदलायचं नाही. आता याच मैदानातून संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हा संपूर्ण भगवा करायचा आहे. हे ठेकेदारांचं राज्य संपवून टाकायचं आहे,” अशा भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना कोकण दौरा करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “तुम्ही फक्त एकदा कोकणचा दौरा करा. कोकणाच्या धर्तीवर एकदा पाऊल ठेवले तर बघा यांची कशी दणादण उडते. एक गद्दार राहणार नाही. सत्तेची भीती आम्हाला नका दाखवू. कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केल्या आहेत. ही पहिली वेळ नाही. लढणाऱ्या शिवसैनिकांना ताकद द्यायची आहे,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी सहदेव बेटकर यांचे पक्षामध्ये स्वागत केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी सहदेव बेटकर म्हणाले की, “1992 पासून मातोश्री ही माझी आहे. मोठ्या साहेबांचं दर्शन घेतल्यापासून तेव्हापासून मी या कुटुंबामध्ये आहे. मी कुठेही नाराज नाही. मी कधीही माझ्या कुटुंबावर टीका केली नाही. मी परत माझ्या घरात आलो आहे. रत्नागिरी जिल्हा हा आपल्या पाठिशी आहे. रत्नागिरीमध्ये आपलं नाव काढल्याशिवाय राहणार नाही,” अशा भावना सहदेव बेटकर यांनी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केल्या आहेत.