Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी गळा कापला, नंतर डोळे फोडून भरले गहू अन् मोहरी; तांत्रिक विधीसाठी तरुणाचा नरबळी

एकविसाव्या शतकातही आपल्या आजूबाजूला अंधश्रद्धेच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अजूनही गुप्तधन शोधण्यासाठी नरबळी द्यायलाही लोक मागे-पुढे पाहत नाहीत.अशीच एक घटना दिल्लीत घडली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 19, 2024 | 06:18 PM
आधी गळा कापला, नंतर डोळे फोडून भरले गहू अन् मोहरी; तांत्रिक विधीसाठी तरुणाचा नरबळी (फोटो सौजन्य-X)

आधी गळा कापला, नंतर डोळे फोडून भरले गहू अन् मोहरी; तांत्रिक विधीसाठी तरुणाचा नरबळी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत अनेक भयावह घटना घडत आहेत. मागील आठवड्यात घडलेला क्रूर नरबळीचा प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. दिल्लीतील पालम परिसरात 55 वर्षीय व्यक्तीचा अतिशय क्रूर पद्धतीन नरबळी देण्यात आला. या व्यक्तीचा रक्त मिळवण्यासाठी आधी गळा कापण्यात आला. त्यानंतर डोळे बाहेर काढून त्यामध्ये गहू आणि मोहरी टाकली. या नरबळी हत्याकांडात खळबळजनक खुलासा झाला असून तांत्रिक कर्मकांडामुळे 55 वर्षीय मध्यमवयीन व्यक्तीचा बळी देण्याचा गुन्हा आरोपींनी केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी आरोपीला यूपीतील एटा येथून अटक केली आहे. त्याचे वय २७ वर्षे असून नाव कार्तिक आहे. हत्या करण्यासाठी आरोपींनी पालममध्येच मृत देवदासला दारू दिली होती. त्यानंतर देवदासच्या घरीच यज्ञ करण्यात आला. कार्तिकने बलिदानाची आधीच योजना आखली होती आणि हत्येसाठी सुरा आधीच खरेदी केला होता. चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की त्याला एक विशेष सिद्धी मिळवायची होती आणि त्यासाठी तो तंत्रक्रिया करत होता.

स्वत:च्या रायफलमधून गोळी झाडून जवानाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी राकेशने बहिणीला केला ‘तो’ मेसेज अन्…

पोलिसांनी 27 वर्षीय कार्तिकला उत्तर प्रदेशातील एटा येथून हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. गुन्हा करण्यापूर्वी आरोपींनी पालम येथील देवदासला दारू दिली होती. यानंतर त्यांच्याच घरी तांत्रिक विधीसाठी त्यांचा बळी देण्यात आला. नरबळीसाठी आरोपींनी अनेक दिवस अगोदर सुरा खरेदी केली होती. चौकशीत आरोपीने सांगितले की तो विशेष यश मिळविण्यासाठी तांत्रिक विधी करत होता. वकिल दीपक त्यागी यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम अहवालातून हे उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला द्वारका न्यायालयातून चौकशीसाठी दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असता मृताच्या डोळ्यात गहू, बार्ली आणि मोहरी असल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी मृताच्या जळालेल्या डोक्याचीही तपासणी केली असता रक्त काढण्यासाठीच डोके धडापासून वेगळे करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर तेल ओतून जाळण्यात आले. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांनी आरोपीची पुन्हा चौकशी केली असता, त्याने मध्यमवयीन व्यक्तीचा बळी दिल्याची कबुली दिली. आरोपीने सांगितले की, त्याला एक विशेष कामगिरी करायची आहे. त्याला तांत्रिक विधीमध्ये यज्ञ करावा लागला, म्हणून त्याने मध्यमवयीन व्यक्तीची हत्या केली.

पोलिसांनी आरोपीला पकडल्यावर त्याने हत्येची कबुली दिली आणि देवदास आपला अपमान करायचा असे सांगितले. बदला घेण्यासाठी त्याने हा गुन्हा केला. आरोपीने यापूर्वी रात्रभर मृतदेहाजवळ थांबल्याचे सांगितले होते, तर मृताच्या डोक्याला आग लावल्याने घरात धूर पसरल्याचे तपासात समोर आले आहे. धूर पसरल्यानंतर आरोपींनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवली आणि मृतदेह कपड्यात गुंडाळून कंटेनरमध्ये ठेवला. यानंतर तो फरार झाला.

गळा चिरण्यापूर्वी दारू पाझली

आरोपीने सांगितले की, तो अनेकदा देवदासच्या इमारतीत मोटार चालवण्यासाठी जात होता. देवदास विवाहित नसून विवाहाशिवाय एका महिलेसोबत राहत होता हे त्याला माहीत होते. महिला आंध्र प्रदेशात गेली होती आणि देवदास घरी एकटाच होता. आरोपी कार्तिक हा अनेकदा देवदासकडे येत होता. घटनेच्या दिवशी आरोपी देवदासच्या घरी गेला. मात्र देवदासला कोणताही संशय आला नाही. नरबळी देण्यापूर्वी आरोपींनी देवदासला दारू दिली होती. यानंतर चपापडीने त्याचा गळा कापण्यात आला.

साताऱ्याच्या खटावमध्ये बेकायदा जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच जणांवर गुन्हा दाखल

Web Title: Delhi crime first he cut his throat then broke his eyes and filled with wheat and mustard youth killed for tantric ritual

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 06:18 PM

Topics:  

  • delhi

संबंधित बातम्या

Nizamuddin Dargah Roof Collapse :  निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठी दुर्घटना, हुजराचे छत कोसळले, ५ जणांचा मृत्यू
1

Nizamuddin Dargah Roof Collapse : निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठी दुर्घटना, हुजराचे छत कोसळले, ५ जणांचा मृत्यू

‘मांस खाणारे स्वतःला प्राणीप्रेमी…’; भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय
2

‘मांस खाणारे स्वतःला प्राणीप्रेमी…’; भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
3

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Huma Qureshi च्या भावाची हत्या कशी झाली? आरोपी हल्ला करत असतानाचा CCTV फुटेज समोर
4

Huma Qureshi च्या भावाची हत्या कशी झाली? आरोपी हल्ला करत असतानाचा CCTV फुटेज समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.