Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinanath Mangeshkar News: दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा आणखी एक गैरकारभार समोर; कोट्यवधींची थकबाकी

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यास नकार दिल्यामुळे एका गंभीर अवस्थेतील गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 05, 2025 | 01:16 PM
Dinanath Mangeshkar News: दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा आणखी एक गैरकारभार समोर; कोट्यवधींची थकबाकी
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळए चर्चेत आलेले पुण्यातील नामवंत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातू महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.  मृत महिला तनिषा भिसे यांच्य कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार, रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी १० लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी, अशी अट घातली होती. पैसे मिळाल्याशिवाय उपचार केले जाणार नाहीत, असं स्पष्ट सांगण्यात आल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. मात्र, आवश्यक ती वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, ही घटना अत्यंत दुःखदायक आहे.  या प्रकऱणामुळे या रुग्णालयाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे.

रुग्णालयाकडून 27 कोटींचा मिळकतकर थकित

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुणे महापालिकेचा तब्बल 27 कोटी रुपयांचा मिळकतकर थकविल्याची माहिती समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून चालवले जाते. रुग्णालय प्रशासनाने गेल्या सहा वर्षांपासून महापालिकेला एकही रुपयाचा कर भरलेला नाही.  2019-20 पासून रुग्णालयाने मिळकतकर भरण्याचे टाळत आहे. त्यामुळे महापालिकेची तब्बल 27 कोटी 38 लाख 62 हजार 874 रुपयांची थकबाकी राहिली आहे.

Beed Crime: …म्हणून आमचं कारागृह बदललं ? त्या राड्याबाबत महादेव गित्तेचा गौप्यस्फोट

एकीकडे रुग्णालय प्रशासन आर्थिक अडचणींचा दाखला देत गरजू रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करत आहे, तर दुसरीकडे स्वतःची आर्थिक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. जरी धर्मदाय संस्थांना मिळकतकरात सवलतीचा दावा केला जात असला, तरी महापालिकेच्या नोंदींनुसार रुग्णालयाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.

त्याशिवाय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेंतर्गत एका रुग्णाने उपचाराची मागणी केली असता, त्यालाही  रुग्णालय प्रशासनाने थेट कागदावर “महात्मा फुले योजनेचा लाभ येथे मिळणार नाही”  असे लेखी दिल्याचे प्रकरणही समोर आले आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेचा उद्देश राज्यातील गरीब व गरजू नागरिकांना गंभीर आजारांवर मोफत आणि कॅशलेस उपचार उपलब्ध करून देणे आहे. परंतु एवढ्या नामांकित रुग्णालयात ही योजना लागू होत नसल्याने, गरजू रुग्णांवर परिणाम होतोय, ही बाब चिंता वाढवणारी ठरत आहे.

भारतातील “हे” ३ हिल्स स्टेशन देतात स्वर्गात असल्याचा अनुभव, काश्मीर पेक्षाही सुंदर

Web Title: Dinanath mangeshkar hospital administration takes big decision after the death of a pregnant woman nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 12:18 PM

Topics:  

संबंधित बातम्या

Dinanath Mangeshkar Hospital Update: दीनानाथला महापालिकेचा पहिला दणका; २२ कोटी दोन दिवसात जमा करण्याचे रुग्णालयास आदेश
1

Dinanath Mangeshkar Hospital Update: दीनानाथला महापालिकेचा पहिला दणका; २२ कोटी दोन दिवसात जमा करण्याचे रुग्णालयास आदेश

महिलेच्या मृत्यू प्रकरणावर डीन धनंजय केळकर यांची पत्रकार परिषद; म्हणाले, “आमच्याकडे कर्मचारी म्हणून…”
2

महिलेच्या मृत्यू प्रकरणावर डीन धनंजय केळकर यांची पत्रकार परिषद; म्हणाले, “आमच्याकडे कर्मचारी म्हणून…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.