hill station( फोटो सौजन्य- pinterest)
एप्रिल महिन्याची सुरवात झाली आहे. आता उन्हाळ्यात सगळे थंड ठिकाणे फिरायला जाण्याची प्लॅनिंग करत आहेत आणि फिरायला जायचं म्हंटल्यावर हिल्स स्टेशन जायला सगळ्यांना आवडत. आता हिल्स स्टेशन म्हंटल्यावर काश्मीर, शिमला मनाली, नैनिताल हे आधी डोक्यात येत. जर तुम्ही काश्मीर, शिमला मनाली, नैनिताल फिरायला जाण्याचा विचार करत असला तर थांबा. भारतात अशे काही ठिकाणे आहेत जे काश्मीर पेक्षा जास्त सुंदर आहे. चला तर जाणून घेऊयात त्या ठिकाणांच्या बाबतीत.
उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. हवामान खात्याने एप्रिलपासून हीटवेवचा इशारा जारी केला आहे. अशा परिस्थितीत लोकांची परिस्थिती दयनीय असू शकते. अश्यात सगळ्यांना थंड ठिकाणे फिरायला जाऊन उष्णतेपासून वाचावं असं वाटत आहे. काश्मीर फिरायला जाणाऱ्या सुंदर ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे. परंतु काश्मीर मध्ये लोकांची गर्दी खूप असते. मात्र भारतात अशे काही ठिकाणे आहे जे काश्मीर पेक्षा आधीक सुंदर दृश्ये आहे जिथे तुम्ही तुमचा टेन्शन विसरून तुम्ही शांत क्षण घालवू शकता.
बेरीनाग हिल स्टेशन
हा हिल स्टेशन उत्तराखंडच्या पिथौरागढ़ जिल्ह्यात स्थित आहे. हे समुद्रसपाटीपासून १८६० मीटर उंचीवर वसलेले आहे आणि ते त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि प्राचीन नाग मंदिरांसाठी ओळखले जाते. येथे तुम्ही नाग देवता मंदिर, क्वेराली, धानोली, चिनेश्वर धबधबा, भाटी व्हिलेज, कालीसन मंदिर आणि बाणा गावाला भेट देऊ शकता. येथे तुम्ही सुंदर दऱ्यांमध्ये शांततेचे क्षण घालवू शकता.
तवांग हिल स्टेशन
अरुणाचल प्रदेशातील तवांग हे एक अतिशय सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे. येथील बर्फाने झाकलेले पर्वत, सुंदर मठ, तलाव आणि हिरव्यागार दऱ्या हे ठिकाण अद्वितीय बनवतात. तवांगचे सौंदर्य विशेषतः हिवाळ्यात शिगेला पोहोचते. तुम्ही उन्हाळ्यातही या ठिकाणाला भेट देऊ शकता. हे ठिकाण आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. शहरांच्या गोंगाटाने त्रस्त असलेले लोक तवांगला येऊ शकतात, जे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे.
लॅन्सडाउन हिल स्टेशन
जर तुम्हालाही गर्दीपासून दूर शांत ठिकाणी जायचे असेल, तर उत्तराखंडमधील लॅन्सडाउन हे तुमच्यासाठी परिपूर्ण हिल स्टेशन आहे. पाइन आणि ओकच्या घनदाट जंगलांनी वेढलेले हे हिल स्टेशन नैसर्गिक सौंदर्याचे एक अद्भुत उदाहरण आहे. ते काश्मीरपेक्षाही सुंदर असल्याचे म्हटले जाते. येथील सुंदर दऱ्या निसर्गाचे सौंदर्य प्रतिबिंबित करतात. हे बघून तुम्हाला स्वर्गासारख वाटेल. तुम्ही कधीही या हिल स्टेशनला भेट देऊ शकता. येथील हवामान नेहमीच चांगले असते.
Shivaji Maharaj Punyatithi : शिवरायांचे महानिर्वाण कधी आणि कुठे झाले ?