dindoshi crime news police arrested criminal who stole gold and silver from jain temples posing as preist in mumbai nrvb
मुंबई : क्राईम पेट्रोल मालिका (Crime Petrol Serial) पाहून गुन्ह्याची पद्धत (Idea Of Crime) शोधून काढणाऱ्या चोरट्याला पकडण्यात दिंडोशी (Dindoshi, Mumbai) पोलिसांना यश आले. हा व्यक्ती पुजार्याच्या वेशात जैन मंदिरात जायचा (He go to the Jain temple in the guise of a priest), नंतर तिथे पूजा (Pooja) करण्याच्या बहाण्याने मंदिरात ठेवलेली सोन्याची थाळी आणि प्लेट (Golden Thali And Plate) चोरून (Stolen) पळून जायचा. चोरीचा माल विकून तो त्या पैशांत जुगार खेळायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जानेवारी रोजी बनावट पुजारी बनून एका व्यक्तीने जैन मंदिरातून १६० ग्रॅम वजनाची सोन्याची प्लेट चोरली. भरत सुखराज दोशी असे आरोपीचे नाव आहे.
तो रोज ५ जैन मंदिरांची रेकी करत असे, नंतर संधी मिळताच त्याने चोरीची घटना घडवून आणल्याचे दिंडोशी पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी एका जैन पुजार्याने दिंडोशी पोलिस ठाण्यात (Dindoshi Police Station, Mumbai) चोरीबाबत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास सुरू केला आणि मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन (CCTV Footage Scan) करण्यास सुरुवात केली तेव्हा आरोपीबद्दल एक सुगावा लागला. सुखराज दोशी (Sukhraj Doshi) याला मुंबईतील मालाड पश्चिम येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे सोन्याचे भांडेही सापडले असून, ते पोलिसांनी जप्त केले आहे.
[read_also content=”अशी कशी औदसा आठवली! पाणी भरण्यासाठी घेत होते दोरीचा शोध, त्यानंतर दिसला महिलेचा लटकलेला मृतदेह ; पुढे जे झालं ते तुम्हीच वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/crime/godda-crime-news-dead-body-of-married-woman-found-hanging-in-laws-accused-of-murder-for-dowry-nrvb-365732.html”]
दिंडोशीचे पोलिस अधिकारी धनंजय कवडे (Police Officer Dhananjay Kawade) यांनी सांगितले की, जैन साधू धीरज लाल शहा यांनी पोलीस ठाण्यात सोन्याच्या भांडी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज शोधले असता तेथे एक व्यक्ती रेकी करताना दिसली. पोलिसांनी त्याचा शोध सुरू करून त्याला अटक केली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याने इतर अनेक जैन मंदिरात अशाच पद्धतीने चोरीच्या घटना घडवून आणल्याचे सांगितले.
[read_also content=”हँडपंप बसवणाऱ्या सर्वे टीमने IM चा दहशतवादी शहजादच्या आवळल्या मुसक्या, बाटला हाऊस एनकाऊंटरमध्ये समोर आलंय शहजादचं धक्कादायक सत्य; वाचा संपूर्ण प्रकरण https://www.navarashtra.com/crime/shahzad-ahmad-convict-in-batla-house-encounter-case-dies-at-aiims-read-how-police-arrest-nrvb-365707.html”]
पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत. धनंजय कवडे यांनी सांगितले की, आरोपीचे वय ५३ आहे. तो रामचंद्र लेन मालाड पश्चिम येथील रहिवासी आहे. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे साहित्य आणि स्कूटर जप्त करण्यात आली आहे. चौकशीत आरोपीने सांगितले की, क्राइम पेट्रोलची मालिका पाहून त्यानंतर त्याला अशाप्रकारे चोरीची कल्पना सुचली.