Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mhada Lottery : म्हाडाच्या सदनिका आता आवाक्याबाहेर! मुंबईमध्ये बाजारभावापेक्षा अधिक दरामुळे घरांची विक्री रखडण्याची शक्यता

मुंबईमध्ये हक्काचे घर असावे अशी अनेकांची इच्छा असते. मात्र घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून हे स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मुंबईमध्ये घरांच्या किंमती अव्वाच्यासव्वा असल्याने हे स्वप्न अपूर्णच राहते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 20, 2026 | 11:27 AM
म्हाडाच्या सदनिका आता आवाक्याबाहेर! (फोटो सौजन्य-Gemini)

म्हाडाच्या सदनिका आता आवाक्याबाहेर! (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • म्हाडाच्या सदनिका आता आवाक्याबाहेर
  • मुंबईमध्ये बाजारभावापेक्षा अधिक दरामुळे घरांची विक्री रखडण्याची शक्यता
  • ११८ सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’
मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील ११८ सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेतील घरांच्या किंमती सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या आहेत. यामुळे म्हाडाच्या काही घरांच्या किंमती तर ‘मार्केट रेट’पेक्षा जास्त असल्याने ही घरे विकली जाणार की पुन्हा धूळखात पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र मुंबईमध्ये घरांच्या किंमती अव्वाच्यासव्वा असल्याने हे स्वप्न अपूर्णच राहते. खाजगी विकासपेक्षा म्हाडाच्या घरांची किंमत तुलनेने कमी असल्याने सर्वसामान्य म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट बघत असतात. परंतु, यंदा म्हाडाने ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी काढलेल्या काही घरांच्या किमती वगळता महागच असल्याने सर्वसामान्यांची निराशा झाली आहे.

राज्यातील स्कूलबस चालकांचा संपाचा इशारा; ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना फटका बसणार?

अनामत रक्कम भरावी लागणार

सर्वांत कमी किमतीचे घर पीएमजीपी कॉलनी, मानखुर्द येथे असून या घराची किमत ३१ लाख रुपये आहे तर, सर्वात महागडे घर ताडदेव क्रिसेंट टॉवरमध्ये असून या घराची किमत ८ कोटी रुपये आहे. अर्जदाराला योजनेनुसार एक लाख रुपयांपासून ते सहा लाख रुपयांपर्यंत अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

नवीन रेडी रेकनरनुसार घरांच्या किमती आकारण्यात आल्या आहेत. यामुळे सदनिकांच्या किंमती बोड्या वाढल्या आहेत. तरीही  सदनिकांच्या मार्केट रेटपेक्षा कमी किमती आहेत. या योजनेला खरेदीदारांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे, अशी माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

मेंटेनन्सचा नाहक भुर्दंड अर्जदारांवर

म्हाडाच्या लॉटरीतील विजेत्यांना नियमानुसार पाच वर्षे घराची विक्री करता येत नाही. त्याचप्रमाणे प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील विजेत्यांनाही घराच्या विक्रीसाठी पाच वर्षाची अट घातली आहे. तसेच अर्जदारांना डोमेसाईल प्रमाणपत्र देखील बंधनकारक असणार आहे. अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या घरांचा देखभाल खर्च म्हाडाने आपल्या तिजोरीतून भरला आहे. या खर्चाचा समावेश घरांच्या किमतीत करण्यात आल्यामुळे या योजनेतील घरांच्या किमती वाढल्या आहेत. रेडी रेकनर दरामुळेही किमती वाढल्या आहेत.

अन्यथा डिपॉझिट होणार जप्त

अर्जदाराने मनपसंत घराची निश्चिती केल्यानंतर घराच्या विक्री किमतीच्या १० टक्के रक्कम ४८ तासांत ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार आहे. रक्कम भरल्यानंतर अर्जदाराला तात्पुरते देकार पत्र देण्यात येईल.
अर्जदाराने ४८ तासांच्या आत १० टक्के रक्कम न भरल्यास घरावरील दावा रद्द होणार आहे. तसेच अर्जदाराने भरलेली अनामत रक्कम जप्त होणार आहे.

९० दिवसांत उर्वरित रक्कम भरावी लागणार

अर्जदाराला तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर पुढील ९० दिवसांच्या आत उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे. या कालावधीत रक्कम न भरल्यास आणखी ९० दिवसांची मुदतवाढ घेऊन नियमानुसार व्याज आकारणीसह रक्कम भरणे बंधनकारक आहे.
तरीही पैसे न भरल्यास घराचे वितरण रद्द करण्यात येईल. तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर एखाद्या अर्जदाराने घर नाकारले तर घराच्या विक्री किमतीच्या १ टक्के रक्कम वजा करून उर्वरित रक्कम अर्जदाराला परत करण्यात येईल.

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

 

Web Title: Mhada mumbai board registration start for 118 homes on first come first serve basis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • mhada
  • MHADA Lottery 2026
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
1

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Mhada चा मोठा निर्णय! GTB नगरच्या रहिवाशांना मिळणार महिन्याला २० हजार, तर…
2

Mhada चा मोठा निर्णय! GTB नगरच्या रहिवाशांना मिळणार महिन्याला २० हजार, तर…

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
3

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
4

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.