डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार
गडचिरोली : रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना देव समजले जाते. मात्र, गेल्या काही वर्षात याच डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना कोरची तालुक्यात उघडकीस आली आहे. उपचाराच्या नावाखाली खासगी डॉक्टरने एका तरुणीशी गैरवर्तन केले. ही घटना बुधवारी (दि.2) सकाळी 9 वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोरी येथे घडली.
डॉक्टर असलेल्या सुभाष हरप्रसाद बिश्वास (वय 48, रा. बोरी, ता. कोरची) याच्या विरोधात बेडगाव पोलिसांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुभाष यास अटक केली. बेडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातील 26 वर्षीय पीडित तरुणीला जुलाबाचा त्रास होत असल्याने ती आपल्या भावासोबत तालुक्यातील बोरी येथील आरोपी खासगी डॉ. सुभाष बिश्वास यांच्या रुग्णालयात उपचारासाठी आली होती. उपचाराच्या बहाण्याने आरोपी डॉक्टरने तिला केबिनमधील चेकअप बेडवर झोपवून तिच्याशी गैरवर्तणूक केले.
दरम्यान, पीडित तरुणीने आरडाओरड करताच तरुणीचा भाऊ केबिनमध्ये धावून आला. यावेळी डॉक्टरने तिच्या भावासोबतही बाचाबाची केली. तत्काळ पीडित तरुणीने बेडगाव पोलिस मदत केंद्र गाठून डॉक्टराविरोधात तक्रार दाखल केली.
आरोपी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
पीडितेच्या तक्रारीवरून डॉ. सुभाष बिश्वास याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक केली. वैद्यकीय अहवालासाठी पीडित तरुणीला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. पुढील तपास बेडगाव पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक वर्षा बोरसे करीत आहेत.
पुणे जिल्ह्यातील दौंडमध्येही विनयभंग
राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता दौंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दौंड पोलीस ठाणे हद्दीतील भीमनगर येथे एका लहान मुलीचा विनयभंग करून जातिवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. बाबा चांद शेख ( रा. भीमनगर, दौंड ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
हेदेखील वाचा : प्रेमीयुगलांसाठी मोठी बातमी! ‘I Love You म्हणणं हा लैंगिक छळ…’; हायकोर्टाने ‘या’ प्रकरणात दिला महत्वाचा निर्णय