पॉस्को प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता (फोटो- istockphoto)
नागपूर: मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एका पॉक्सो अंतर्गत असलेल्या प्रकरणात एक महत्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील तरुणाची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. केवळ आय लव्ह यू म्हटल्याने लैंगिक छळ होऊ शकत नाही असे नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले आहे. लैंगिक छळाचा हेतू सिद्ध होणे आवश्यक आहे, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या तरुणाची सुटका झाली आहे.
आय लव्ह यु म्हणणे हें केवळ भवन व्यक्त करणे आहे. तो लैंगिक छळ होत नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणातील तरुणाची शिक्षा हायकोर्टाने रद्द केली आहे. त्यामुळे केवळ आय लव्ह यु म्हणणे हा लैंगिक छळ होऊ शकत नाही असे महत्वाचे निरीक्षण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे.
नक्की प्रकरण काय?
आय लव्ह यु म्हणणे हे भावना व्यक्त करण्याची कृतोय असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणात एका ३५ वर्षीय आरोपीने शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात थांबवून तिचा हात पकडून आय लव्ह यू म्हटले होते. त्यानंतर त्याने तिला तिचे नाव विचारले होते. या प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि तिएन घरी जाऊन आपल्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान नागपूर सत्र न्यायालायने या आरोपीला लैंगिक छळाच्या गुन्ह्यात ३ वर्षांचा सश्रम तुरुंगवास ठोठावला होता. या निर्णयाविरुद्ध आरोपीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान सुनावणी घेत हायकोर्टाने आरोपीला निर्दोष मुक्त केले आहे. शारीरिक स्पर्शाला लैंगिक छळ म्हणता येऊ शकते एखादा व्यक्ती शब्दांच्या माध्यमातून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर, तो लैंगिक छळ समजला जाऊ शकतो. मात्र केवळ आय लव्ह यू म्हणणे हा लैंगिक छळ होऊ शकत नाही असे हायकोर्टाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे.