Gadchiroli Naxal News: गडचिरोलीमध्ये अकरा नक्षलवाद्यांनी डीजीपी रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर एकूण ₹८२ लाख बक्षीस होते. या वर्षी आतापर्यंत ११२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
तहसीलजवळील एक जागा निवडण्यात आली होती, परंतु आता चामोशी तहसीलमधील एक पर्यायी जागा प्रस्तावित प्रकल्पासाठी अधिक योग्य म्हणून ओळखली गेली आहे. नवीन जागा खाजगी, वन आणि सरकारी जमिनीचे मिश्रण आहे.
गडचिरोलीत नक्षलवाद्यां विरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून गडचिरोलीत चार नस्खलवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश…
संत तलांडी हे पाण्यात वाहून गेल्याची माहिती महसूल व पोलिस विभागास देण्यात आली. घटनेनंतर शोधमोहीम राबविण्यात आली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सिपनपल्ली नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्याच्या जवळपास सर्वच तालुक्यात भाताची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धानाची विक्री शासकीय खरेदी केंद्रावर केली.
ताप, मळमळ, चक्कर, उलटी, सर्दी, खोकला असे जाणवू लागले. तेव्हा त्यापैकी १६ विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या आमगाव महाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळच्या सुमारास दाखल करण्यात आले होते.
अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी धाव घेत मदतीचा हात पुढे केला. ट्रक रस्त्यावर आडवा पलटी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. काही वेळासाठी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात 167 नागरिकांना सर्पदंश झाला असून यातील 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दाखवलेल्या तत्परतेममुळे वेळीच उपचार मिळाले आणि अनेकांचे प्राण वाचविण्यात यश आलं आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे एका बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या औषधोपचार करताना रंगेहात पकडण्यात आल्याची तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी दिली.
वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी केली असता केवळ एका व्यक्तीकडे बीएएमएसची अधिकृत पदवी असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला संबंधित पॅथीमध्येच वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले गेले.
Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांचे जीवनमान उंचावणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस आणि शासन प्राधान्य देताना पाहायला मिळत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास चोवीसच्यावर गावातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना नेहमीच आरोग्याशी - संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
यामुळे गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून हत्तीपायाचे 3026 रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे. हत्तीपायाच्याडासांचा दंश झाल्यानंतर थोडा ताप येतो. पण 18 महिन्यांपर्यंत ठळक लक्षणे दिसत नाहीत.
महिलांच्या सभोवताल विजांचा कडकडाट झाल्यामुळे विजेच्या धक्क्याने एक महिला चिखलात पडली. तिला तत्काळ विसोरा येथील खाजगी दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. उरलेल्या महिलांनाही त्यावेळी फार काही जाणवले नाही.
दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला आदिवासी समाजातील लोकांकडून गावपूजा केली जाते. ही पूजा सलग तीन दिवस चालते. शुक्रवारी दोडगेर गावातही अशाच प्रकारची पूजा आयोजित करण्यात आली होती.
कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात व बीड जिल्ह्यात मिरची तोडण्याच्या नावावर ऊस कापणीसाठी डांबून ठेवलेल्या 49 मजुरांचे लाखो रुपये हडपणारा तो कंत्राटदार अद्यापही मोकाटच आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मलेरियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या 7 दिवसात गडचिरोली जिल्ह्यात मलेरियामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
पीडित तरुणीने आरडाओरड करताच तरुणीचा भाऊ केबिनमध्ये धावून आला. यावेळी डॉक्टरने तिच्या भावासोबतही बाचाबाची केली. तत्काळ पीडित तरुणीने बेडगाव पोलिस मदत केंद्र गाठून डॉक्टराविरोधात तक्रार दाखल केली.