Dombivli Kidnapping Case : डोंबिवली अपहरण-खंडणी प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपींच्या अटकेसाठी उच्च न्यायालयात धाव

डोंबिवली पूर्वेतील व्यावसायिकाच्या अपहरण आणि खंडणी प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आरोपींना अद्याप अटक न झाल्याने तक्रारदार व्यावसायिकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चार्जशीटपूर्वीच आरोपी निर्दोष सुटल्याचा मेसेज पसरवल्याचा दावाही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिकाचे वकील पत्रकार परिषद घेणार आहेत.
Dombivli Kidnapping Case : डोंबिवली अपहरण-खंडणी प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपींच्या अटकेसाठी उच्च न्यायालयात धाव
Dombivli Kidnapping Case : डोंबिवली अपहरण-खंडणी प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपींच्या अटकेसाठी उच्च न्यायालयात धावDombivli Kidnapping Case : डोंबिवली अपहरण-खंडणी प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपींच्या अटकेसाठी उच्च न्यायालयात धाव
Published on: 
Updated on: 
  • अपहरण करून खंडणी मागितल्याचा आरोप

  • व्यावसायिकाचे वकील घेणार पत्रकार परिषद!

  • आरोपीच्या मॅसेजमुळे तक्रारदार व्यावसायिक चिंतेत

Dombivli Kidnapping Case : डोंबिवली पूर्वेतील देशमुख होम परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी मागितल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणात तक्रारदार व्यावसायिकाचे वकील शुक्रवारी दुपारी मानपाडा पोलीस ठाण्यासमोर पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींना अटक होत नाही म्हणून या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

व्यावसायिक अपहरण आणि खंडणी प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अजित सिंह यांच्यासह चार जण आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप आरोपींवर अटकेची कारवाई झालेली नसल्याने व्यावसायिक आणि त्यांच्या नातेवाईकांकडून पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

प्रकरणाबाबत संभ्रम निर्माण, तक्रारदार चिंतेत

अखेर या प्रकरणात उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीकडून मी निर्दोष मुक्त झाल्याचा मेसेज समाजमाध्यमांवर किंवा इतर माध्यमांतून पसरवला जात असल्याचा दावा तक्रारदार व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत संभ्रम निर्माण झाला असून तक्रारदारांनी चिंता व्यक्त केली आहे.

Dombivli Kidnapping Case : डोंबिवली अपहरण-खंडणी प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपींच्या अटकेसाठी उच्च न्यायालयात धाव
Mumbai Bombblast Threat: मुंबईला पुन्हा दहशतवादी हल्ल्याची धमकी, अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर आणि मेट्रो स्टेशनवर बॉम्ब हल्ल्याचा दावा

पोलीस ठाण्यासमोरच तक्रारदाराच्या वकीलाची पत्रकार परिषद

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी व्यावसायिकांचे वकील मानपाडा पोलीस ठाण्यासमोर पत्रकार परिषद घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका संदर्भातली माहिती पोलिसांची भूमिका, तपासाची सद्यस्थिती आणि पुढील कायदेशीर वाटचाल याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

त्यामुळे या पत्रकार परिषदेत वकील नेमका काय खुलासा करतात आणि या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.

Dombivli Kidnapping Case : डोंबिवली अपहरण-खंडणी प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपींच्या अटकेसाठी उच्च न्यायालयात धाव
मंदार किवळे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी