Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ईडी’ची मोठी कारवाई ! तब्बल 200 कोटींची खाती गोठवली; व्हॉट्सॲप टिप्सद्वारे शेअरची फसवणूक

प्रवर्तन निर्देशालयाने कारवाईदरम्यान दोन कंपन्यांची कार्यालये, प्रवर्तकांची निवासस्थाने, कमी किमतीत शेअर्स मिळालेल्या व्यक्तींची घरे, फायनान्स फर्मची कार्यालये तसेच प्रमोशनल व्हॉटसअॅप ग्रुप चालवणाऱ्या संशयितांच्या ठिकाणी छापे टाकले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 21, 2026 | 12:21 PM
व्हॉट्सअॅप टिप्सद्वारे शेअरची फसवणूक

व्हॉट्सअॅप टिप्सद्वारे शेअरची फसवणूक

Follow Us
Follow Us:
  • दोन लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये कथित ‘पंप अँड डंप’ फसवणूक
  • तब्बल 200 कोटींची खाती गोठवली
  • व्हॉट्सॲप टिप्सद्वारे शेअरची फसवणूक
नाशिक : व्हॉटअसअॅप ग्रुपवरून ‘मल्टीबॅगर’ शेअर्सच्या टिप्स देत किरकोळ गुंतवणूकदारांना खरेदीस प्रवृत्त करून दोन लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये कथित ‘पंप अँड डंप’ फसवणूक केल्याप्रकरणी प्रवर्तन निर्देशालयाने (‘ईडी’) मोठी कारवाई केली आहे. ‘ईडी’च्या मुंबई झोनल ऑफिस-१ ने मुंबईसह नाशिक, अहमदाबाद, गांधीनगर, सूरत आणि भावनगर या सहा शहरांतील २९ ठिकाणी छापेमारी केली. ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ अंतर्गत करण्यात आली असून, संबंधित व्यक्ती आणि संस्थांशी निगडित सुमारे २०० कोटी रुपयांची ट्रेडिंग खाती गोठवण्यात आली आहेत.

प्रवर्तन निर्देशालयाने कारवाईदरम्यान दोन कंपन्यांची कार्यालये, प्रवर्तकांची निवासस्थाने, कमी किमतीत शेअर्स मिळालेल्या व्यक्तींची घरे, फायनान्स फर्मची कार्यालये तसेच प्रमोशनल व्हॉटसअॅप ग्रुप चालवणाऱ्या संशयितांच्या ठिकाणी छापे टाकले. यात ‘मेसर्स आर. एम. ड्रिप अँड संप्रंकलर्स सिस्टिम्स लिमिटेड’ आणि ‘मेसर्स आर अँड बी डेनिम्स लिमिटेड’ या दोन लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत फेरफार केल्याचा संशय आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान संबंधित कंपन्यांनी निवडक व्यक्तींना साडेतीन कोटींपेक्षा जास्त शेअर्स आणि कन्व्हर्टिबल वॉरंट्स जारी केल्याचे समोर आले आहे.

Mumbai Crime News : सहाव्या मजल्यावरून चिमुकल्याला फेकले; सीसीटीव्हीने उघड केला धक्कादायक प्रकार

डिसेंबर २०२५ अखेरपासून फेब्रुवारी २०२६ पर्यंत नावांच्या व्हॉटसअॅप कम्युनिटीजद्वारे किरकोळ गुंतवणूकदारांना दररोज हे शेअर्स खरेदी करण्याच्या टिप्स पाठवल्या जात होत्या. हे ग्रुप हरियाणा आणि मुंबईतील व्यक्तींच्या सिम कार्डवर चालवले जात असून, त्यांचे संचालन भावनगर येथून होत होते. ‘आर. एम. ड्रिप’च्या शेअरचा मोठ्या प्रमाणात प्रचार करून ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये वाढ करण्यात आली. याच वाढलेल्या मागणीचा फायदा घेत कमी किमतीत शेअर्स पर्यंत ‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ मिळवलेल्या लाभार्थ्यांनी आपले शेअर्स सामान्य गुंतवणूकदारांना विकल्याचा ‘ईडी’चा आरोप आहे.

कागदपत्रे केले जप्त

छापेमारीदरम्यान अफ्लुएन्स जेम्स, कावा एचयूएफ आणि कोमले कन्सल्टन्सी या लाभार्थी गटांची ओळख पटली असून, डिजिटल उपकरणे व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. नाशिकमधील सहभागामुळे स्थानिक गुंतवणूकदारांत खळबळ उडाली आहे.

‘पंप अँड डंप’ म्हणजे काय?

यात काही लोक कमी किमतीत शेअर्स घेऊन सोशल मीडियावरून प्रचार करतात. किंमत वाढल्यावर आपले शेअर्स विकून नफा कमावतात आणि भाव घसरल्याने सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान होते. त्यामुळे गुंतवणुकदारांनी व्हॉटसअॅप किंवा टेलिग्रामवरील शेअर टिप्सवर विश्वास ठेऊ नये. ‘मल्टीबॅगर’ किंवा ‘गॅरंटीड रिटर्न’ देणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे. कंपनीची आर्थिक स्थिती तपासून संशयास्पद सल्ला मिळाल्यास सेबी किंवा पोलिसांकडे तक्रार करावी.

FAQ

तब्बल 200 कोटींची खाती कुणी आणि का गोठवली?

– अंमलबजावणी संचालनालयाने (ED) – Enforcement Directorate ने. महाराष्ट्रात मुंबई, नाशिक + गुजरातमध्ये अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, भावनगर कारवाई केली.

हा 200 कोटींचा घोटाळा नक्की काय होता? Pump & Dump कसा झाला?

– ही WhatsApp मल्टीबॅगर घोटाळा केस आहे. या 2 कंपन्यांनी 3.5 कोटींपेक्षा जास्त शेअर्स + Convertible Warrants निवडक लोकांना स्वस्तात दिले.

Web Title: Ed freezes accounts worth 200 crores in nashik nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 12:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.