Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ED In Action : दाऊदच्या साथीदाराच्या ड्रग्ज नेटवर्कला ईडीचा दणका; दोघांना अटक

ED In Action : ईडीने एका मोठ्या कारवाईत दाऊद इब्राहिमचा सहकारी असेल्या सलीम डोलाच्या दोन हस्तकांना अटक केली आहे. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी ही अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 09, 2026 | 06:02 PM
ED In Action : दाऊदच्या साथीदाराच्या ड्रग्ज नेटवर्कला ईडीचा दणका; दोघांना अटक

ED In Action : दाऊदच्या साथीदाराच्या ड्रग्ज नेटवर्कला ईडीचा दणका; दोघांना अटक

Follow Us
Follow Us:
  • सलीम डोला टोळीशी आरोपींचा संबंध
  • एमडी ड्रग्जची निर्मिती, पुरवठा आणि तस्करीचे जाळे
  • हवाला व्यवहार आणि मालमत्ता खरेदीसाठी गुन्ह्यातील पैशांचा वापर
 

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी असलेल्या सलीम इस्माईल डोलाशी संबंधित आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी टोळीविरोधात अंमलबाजवणी संचालनालयाने (ईडी) (ED In Action) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी प्रवीण उर्फ नागेश रामचंद्र शिंदे आणि बृजेश कांजीभाई मोराडिया या दोघांना अटक करण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध तपास यंत्रणांनी सलीम डोला आणि त्याच्या साथीदारांविरोधात अमली पदार्थांच्या बेकायदा तस्करीप्रकरणी दाखल केलेल्या अनेक गुन्ह्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला.

संघटित जाळे समोर

तपासात मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची गुप्तपणे निर्मिती, त्याची राज्यांतर्गत व आंतरराष्ट्रीय तस्करी, तसेच हवाला मार्गाने गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांची देवाणघेवाण आणि लपवाछपवी करणारे संघटित जाळे असल्याचे समोर आल्याचा दावा ईडीने केला आहे.

प्रवीण शिंदे हा एमडीच्या बेकायदा निर्मितीशी आणि त्याच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या व्यवहारांशी संबंधित असल्याचा ईडीचा आरोप आहे. या पैशांचा वापर जवळच्या व्यक्तींच्या नावावर स्थावर मालमत्ता व अन्य मालमत्ता खरेदी करण्यासाठी करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे ईडीने म्हटले आहे.

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

डोलाकडून अंगडियांचा वापर

तर बृजेश मोराडिया हा एमडीच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनांची खरेदी आणि पुरवठा यांची व्यवस्था करत असल्याचा आरोप आहे. सलीम डोलाकडून अंगडिया यंत्रणेमार्फत मिळालेली रोकड विविध तृतीय पक्षांच्या व कुटुंबीयांच्या खात्यांत जमा करून बँकिंग माध्यमातून रासायनिक कंपन्यांकडे पाठवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

या व्यवहारांतून मिळालेली कमिशनची रक्कम पुढे विविध खात्यांमध्ये वळवून वापरण्यात आल्याचाही ईडीचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या

Web Title: Ed in action arrests two drug smugglers linked to salim dola gang rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • dawood ibrahim
  • Enforcement Directorate

संबंधित बातम्या

Cyber Crime : ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक फंडा; 6 बँकांमधील 43 खात्यांतले 2.12 कोटी ईडीने केले जप्त
1

Cyber Crime : ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक फंडा; 6 बँकांमधील 43 खात्यांतले 2.12 कोटी ईडीने केले जप्त

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?
2

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.