Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RG Kar College चे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर ईडीची मोठी कारवाई, घरावर ईडीचा छापा

पश्चिम बंगालच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या माजी प्राचार्याविरुद्ध ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय एजन्सीने शुक्रवारी सकाळ-सकाळ संदीप घोष यांच्या घरावर छापा टाकला असल्याची माहिती मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 06, 2024 | 08:48 AM
आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर ईडीची मोठी कारवाई (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर ईडीची मोठी कारवाई (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

पश्चिम बंगालच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या माजी प्राचार्याविरुद्ध ED अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय एजन्सीने शुक्रवारी (6 सप्टेंबर) संदीप घोष यांच्या घरावर छापा टाकला असून शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय राज्यातील अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत.

पीएमएलए प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. 9 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर निर्घृण हत्या करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता.

याचदरम्यान ईडीने घोष आणि त्याच्या निकटवर्तीयांशी संबंधित 5-6 ठिकाणांवर छापे टाकल्याचे वृत्त आहे. याशिवाय ईडीचे अधिकारी रुग्णालयातील डेटा एन्ट्री ऑपरेटर प्रसून चॅटर्जी यांच्या घरीही पोहोचले आहेत. सीबीआयने मंगळवारी घोष यांना त्यांच्या कार्यकाळातील अनियमिततेच्या आरोपावरून अटक केली होती. त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. येथे पश्चिम बंगाल सरकारने त्यांना निलंबित करण्यात आले.

सीबीआयने अटक करण्यापूर्वी घोष यांची एजन्सीच्या सॉल्ट लेक कार्यालयात 15 दिवस चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने अत्याचार आणि हत्या प्रकरणात प्रशिक्षणार्थी डॉक्टरची चौकशी केली होती. याशिवाय रुग्णालयातील आर्थिक अनियमिततेबाबतही प्रश्न विचारण्यात आले. घोष यांना दोनदा पॉलीग्राफ चाचणीही द्यावी लागली. मनी लाँड्रिंगच्या आरोपात ईडी घोषची चौकशी करत आहे.

हे सुद्धा वाचा:  CBI ने केली पोलखोल, RG Kar College चे माजी प्राचार्याचा मोठ्या रॅकेटमध्ये सहभाग, आंदोलकांनी केली फाशीची मागणी

माजी प्राचार्य संदीप घोष मोठ्या रॅकेटचा भाग

कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष हे एका मोठ्या रॅकेटचा भाग होते, याचा पदार्फाश करणे आवश्यक होते असं सीबीआयने विशेष न्यायालयाने सांगितलं. रुग्णालयातील भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी सीबीआयकडून केली जात आहे. याप्रकरणी संजय घोषला १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली असून याप्रकरणी १२ सीबीआय अधिकारी आणि २५ सीआरपीएफ जवान त्याच्या संरक्षणासाठी उपस्थित होते.

याप्रकरणी अटक

2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी संदीप घोषसह आणखी तिघांना अटक करण्यात आली. बिप्लव सिंग, सुमन हाजरा आणि अफसर अली खान अशी अन्य तीन जणांची नावे आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. आर.जी.कार मेडिकल कॉलेजचे माजी उपअधीक्षक डॉ.अख्तर अली यांनी संदीप घोष यांच्या प्राचार्यपदाच्या कार्यकाळात अनेक प्रकरणांमध्ये आर्थिक अनियमिततेचा गुन्हा दाखल केला होता. घोष यांच्यावर रुग्णालयात बेवारस मृतदेहांची तस्करी, जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात भ्रष्टाचार आणि बांधकाम निविदांमध्ये घराणेशाहीचे आरोप होते. कोलकाता पोलिस यापूर्वी या प्रकरणांचा तपास करत होते. पण नंतर कोलकाता उच्च न्यायालयाने ते सीबीआयकडे सोपवले. 3 सप्टेंबर रोजी अलीपूर कोर्टाने या चार आरोपींना 8 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती.

Web Title: Ed raids house of sandeep ghosh former principal of kolkata rg kar medical college

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 08:48 AM

Topics:  

  • Kolkata doctor case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.