
मंगळवेढ्यात आर्थिक वादातून एकाची हत्या; छातीतच चाकू भोसकला
अमरावती : वन्यप्राण्यांपासून पिकांच्या रक्षणासाठी रात्री शेतात जागली करत असलेल्या शेतकऱ्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. 22) खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोपगव्हाण शिवारात उघडकीस आली. याप्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द हत्येचा गुन्हा नोंदविला आहे.
सुनील सुखदेव सोळंके (42, रा. गोपगव्हाण पुनर्वसन) असे मृताचे नाव आहे. सोळंके यांनी गोपगव्हाण शिवारात मक्त्याने शेत केले होते. या शेतात त्यांनी हरभरा पेरला होता. पिकाचे वन्यप्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी ते दररोज रात्री शेतात जागली करत होते. शनिवारी रात्रीसुद्धा नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते. दरम्यान, रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गावातील काही नागरिकांना सुनीलचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला.
नातेवाईकांचा एकच आक्रोश
घटना उजेडात आल्यावर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढून आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.
स्थानिकांनी दिली घटनेची माहिती
स्थानिकांनी या घटनेची माहिती खोलापुरीगेट पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मनोहर कोटनाके, पोलिस निरीक्षक राजेंद्र होळकर, पोलिस उपनिरीक्षक मिनाक्षी बोचे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी मृताच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार दिसून आला. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ठसे तज्ज्ञांचे पाचारण
या घटनेच्या माहितीवरून शेतशिवारात सकाळी मोठी गर्दी जमली होती. या घटनेनंतर तत्काळ खोलापुरी गेट पोलिस, फॉरेन्सिक तज्ज्ञ व ठसे तज्ज्ञांनी पाचारण केले, पोलिसांनी शेजाऱ्यांची चौकशी सुरु केली असून, अज्ञात आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.
बारामतीत 23 वर्षीय मुलाची हत्या
शहरातील प्रगतीनगर याठिकाणी अनिकेत सदाशिव गजाकस (वय २३) या युवकाचा कोयत्याने वार करुन निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणातील तिघांना १२ तासांच्या आत पोलीसांनी सोलापूर जिल्ह्यातील खंडाळी (ता. माळशिरस) येथून पाठलाग करुन जेरबंद केले. 19 डिसेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास अनिकेतचा नंदकिशोर अंभोरे याच्या आते बहिणीसोबत बोलण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. नंतर कोयत्याने वार करुन खून केला.