crime (फोटो सौजन्य: social media )
गोंदियामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोंदियाच्या सडक- अर्जुनी तालुक्याच्या खजरी शेतशिवारात सापडलेल्या एका महिलेच्या हत्या प्रकरणाचा थरारक उलगडा झाल्याचं समोर आलं आहे. केवळ हत्याची नाही तर त्या मृत महिलेच्या ७ महिन्याच्या मुलाची विक्री करण्यामागील टोळीचा भांडाफोड करीत ७ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा उलगडा गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
३ ऑगस्ट रोजी खजरी शेतशिवारात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्या महिलेची हत्या धारधार शास्त्राने वार करून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर खजरी येथील पोलीस पाटील इंद्रराज राऊत यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख पटली. मृत महिलेचे नाव अन्नु नरेश ठाकुर (21) रा. भिलाई, दुर्ग, छत्तीसगड असल्याचे निष्पन्न झाले.
अभिषेक सिद्धार्थ तुरकर (36) रा. भिलाई, ह.मु. डोंगरुटोला गोरेगाव, गोंदिया हा अन्नुशी अनैतिक संबंधात होता. मोठ्या कर्जामुळे पैश्यांच्या गरजेतून त्याने पत्नी पूनम तुरकर, नातेवाईक प्रिया तुरकर आणि साथीदार चांदणी रा. नेहरू नगर, भिलाई यांच्या मदतीने कट रचला. 2 ऑगस्टला अभिषेकने अन्नुला खजरी शेतशिवारात नेऊन चाकूने हत्या केली. नंतर तिच्या 7 महिन्याचा मुलगा धनराज याचे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून मुलाची विक्री करण्यात आली. या प्रकणातील खून करणारे आणि बाळाची खरेदी करणाऱ्या 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कात्रज घाटातील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
प्रेमाला विरोध केल्यानंतर अल्पवयीन मुलाने साथीदारांच्या मदतीने प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी या खूनाचा छडा लावत तिघांना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. जुन्या कात्रज बोगद्याजवळील डोंगरावर कात्रजमधील तरुणाचा खून केला होता.
सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. पंचरत्न सोसायटी, मांगडेवाडी, कात्रज) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी श्रीमंत अनिल गुज्जे (वय २१, रा. खंडोबा मंदिराजवळ, वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, रा. वडगाव मावळ), नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८, रा. गोकुळनगर, कात्रज, मूळ रा. खुठे गाव, ता. औसा, जि. लातूर) यांना अटक केली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहायक निरीक्षक तुकाराम राठोड, उपनिरीक्षक अजित पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.
जुन्या कात्रज बोगद्याजवळ डोंगरावर तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी राजगड पोलिसांत गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी प्रथम मृतदेहाची ओळख पटविली. तेव्हा मृतदेह सौरभ आठवलेचा असल्याची समोर आले. सौरभ १८ ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल होती.