Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shocking : पैशाच्या वादातून हत्या, कालव्यात आढळला जळालेला मृतदेह; खुनाचा थरारक कट उघडकीस

शेतशिवारात शाहनूर धरणाच्या कालव्यात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेह प्रकरणाचे बिंग फुटले आहे. प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून मोठा खुलासा केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 13, 2026 | 06:51 PM
पैशाच्या वादातून हत्या, कालव्यात आढळला जळालेला मृतदेह; खुनाचा थरारक कट उघडकीस

पैशाच्या वादातून हत्या, कालव्यात आढळला जळालेला मृतदेह; खुनाचा थरारक कट उघडकीस

Follow Us
Follow Us:

अमरावती : पथ्रोट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खोडगाव रोडवरील जहानपूर शेतशिवारात शाहनूर धरणाच्या कालव्यात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेह प्रकरणाचे बिंग फुटले आहे. प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून मोठा खुलासा केला आहे. शेख शाहरुख शेख रौफ (रा. आर्वी, जि. वर्धा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात एका अल्पवयीनालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

बुधवारी पथ्रोट पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले एएसआय रवींद्र रामभाऊ शिंपी यांना वाघडोहचे पोलिस पाटील सुभाष काकड यांनी फोनवरून अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह पडल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शाहनूर धरणाच्या कालव्यात अर्धवट जळालेला मृतदेह शोधून काढला. घटनास्थळी चारचाकी वाहनाच्या टायरच्या खुणा आढळून आल्या. प्राथमिक तपासात अन्यत्र हत्या करून मृतदेह ओळख लपवण्यासाठी जाळून कालव्यात टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 दोन वर्षापूर्वीच पत्नीची आत्महत्या, मोबाईलवर आला अचानक OTP; सत्य जाणून पतीच्या पायाखालची जमीनच सरकली

संशयास्पद हालचालींमुळे संशय बळावला

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा, पथ्रोट, रहिमपूर व अंजनगाव सुर्जी येथून विशेष पथके तयार करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू झाला. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पद्मश्री हॉटेलचा मालक शुभम रॉय संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मौल्यवान साहित्य जप्त

पोलिसांनी टिकेश प्रशांत महाजन (२८), प्रशांत हरिचंद्र महाजन (५९), शुभम मोहनलाल रॉय (२८), अली अजगर सबदार हुसेन (२८), हर्षित प्रकाश गौर (१९) व निखिल गौर (३२) यांना अटक केली आहे. एका अल्पवयीनालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीकडून सुमारे ५ लाख किमतीचे चारचाकी वाहन तसेच एकूण ५ लाख ७० हजार किमतीचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपासासाठी आरोपीना पथरोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे, पोनि सूरज बोडे, उपनिरीक्षक अनंत वडतकर, अभय चौथणकर, सचिन पवार, सागर हटवार, नितीन इंगोले तसेच सायबर पोलिस स्टेशनचे विकास अंजीकर व सागर धापर यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

पैशाच्या वादातून रचला खुनाचा कट

तपासात उघडकीस आले की शेख शाहरुख याने पैशाच्या वादातून प्रशांत महाजन यांच्यावर अत्याचार व हल्ला केला होता. यामुळे संतप्त झालेल्या प्रशांत महाजन, त्यांचा मुलगा टिकेश महाजन व साथीदार अली अजगर यांनी शाहरुखच्या हत्येचा कट रचला. अली अजगरने पैशांचे आमिष दाखवून शाहरुखला गावाबाहेर बोलावले. तेथे टिकेश व अली यांनी त्याला मारहाण करून ठार केले. नंतर मृतदेह चारचाकी वाहनातून नेऊन शुभम रॉय यांच्याकडे सोपवण्यात आला. शुभम रॉय, हर्षित गौर व निखिल गौर या कर्मचाऱ्यांसह मृतदेह शाहनूर कालव्यात नेऊन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Vehicle Theft News: शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री २ ‘क्रेटा’सह ६ वाहने लंपास; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Web Title: Murder over money dispute charred body found in canal murder plot uncovered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • amravati
  • crime
  • police

संबंधित बातम्या

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
1

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार
2

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Health Update: अवयवदानातून मिळते इतरांना नवजीवन! अमरावतीत विविध उपक्रम; गैरसमज दूर करून जागृतीची गरज
3

Health Update: अवयवदानातून मिळते इतरांना नवजीवन! अमरावतीत विविध उपक्रम; गैरसमज दूर करून जागृतीची गरज

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
4

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.