वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर 3 लाखांनी फसवणूक
पुणे : इटलीतील कंपनीच्या नावे बनावट ई-मेल पाठवून पुण्यातील नऱ्हे भागातील एका नामांकित कंपनीची तब्बल २ कोटी ३५ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. कंपनीची इटलीतील ऑटोमोबाईल कंपनीशी करारानुसार देवाण-घेवाण सुरू होती. मात्र, सायबर चोरट्याने इटलीतील कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेला बनावट ई-मेल पाठवून ही फसवणूक केली.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ५२ वर्षीय संचालकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सायबर चोरट्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ फेब्रुवारी ते १० जून २०२५ या कालावधीत ही फसवणूक घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या कंपनीचा इटलीतील एका कंपनीशी ऑटोमोबाईल पार्ट्स उत्पादनासाठी मशीन खरेदीचा करार झाला होता. त्यानुसार, ठरलेल्या अटींनुसार काही टप्प्यांमध्ये पेमेंट केले जाणार होते. दोन वेळा पेमेंट प्रक्रिया व्यवस्थित पार पडली. मात्र, तिसर्या टप्प्यातील रकमेच्या पेमेंटवेळी सायबर गुन्हेगारांनी इटलीतील कंपनीच्या अधिकृत ई-मेलसारखा नावात साधर्म असलेला बनावट ई-मेल तयार करून पुण्यातील कंपनीशी संपर्क साधला.
त्यात यापूर्वी पेमेंट केलेल्या खात्याव्यतिरिक्त दुसरे बँक खाते आणि अधिकार्यांची सही असलेले इन्व्हॉईस पाठवण्यात आले. यावर विश्वास ठेवून कंपनीने नवीन साईटवर तब्बल २ कोटी ३५ लाख रुपये ट्रान्सफर केले. युरो चलनामध्ये ही रक्कम पाठविण्यात आली. मात्र, मूळ कंपनीकडून पैसे मिळाले नसल्याचे समजताच फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले.
संपूर्ण प्रकरण सायबर फसवणुकीचे
प्राथमिक तपासात हे संपूर्ण प्रकरण सायबर फसवणुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. यावरून सायबर पोलिसांनी फसवणुकीसाठी वापरलेला ई-मेल आयडी, बँक खातेदार व रक्कम प्राप्त करणार्या इतर बँक खात्यांच्या लाभार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरिक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
राज्यात वाढतंय फसवणुकीचे प्रमाण
राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरात सायबर चोरट्यांकडून फसवणूकीचे प्रकार सुरूच असून, त्यातच शेअर मार्केटमधील गुंतवुणकीच्या बहाण्याने दोघांना तब्बल ४६ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.