Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑनलाइन ओळख पडली महागात; डेटिंग ॲपवरून विश्वास जिंकला, दोन बहिणींना बिअर पाजून हॉटेलमध्ये नेलं अन्…

डेटिंग ॲपवरून सुरू झालेली ओळख विश्वासात बदलली आणि भेटीच्या बहाण्याने दोन सख्ख्या बहिणींना सीवूड्सला बोलावण्यात आले. यानंतर हॉटेलमध्ये नेऊन त्यांना मद्य पाजल्याचा आणि त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 13, 2026 | 04:59 PM
ऑनलाइन ओळख पडली महागात; डेटिंग ॲपवरून विश्वास जिंकला, दोन बहिणींना बिअर पाजून हॉटेलमध्ये नेलं अन्...

ऑनलाइन ओळख पडली महागात; डेटिंग ॲपवरून विश्वास जिंकला, दोन बहिणींना बिअर पाजून हॉटेलमध्ये नेलं अन्...

Follow Us
Follow Us:
  • डेटिंग ॲपवरून दोन्ही बहिणींना भेटण्यासाठी बोलावले
  • बिअर पाजून नशेचा गैरफायदा घेत अत्याचार
  • मॉल, हॉटेल आणि टॅक्सी सीसीटीव्हीवरून आरोपींचा शोध
नवी मुंबई: डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख वाढवून तरुणींना भेटीसाठी बोलावून त्यांचा गैरफायदा घेतल्याचा गंभीर प्रकार नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात समोर आला आहे. ‘Tinder’ या डेटिंग ॲपवरून ओळख झालेल्या दोन सख्ख्या बहिणींना भेटीच्या बहाण्याने सीवूड्स येथे बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांना एका हॉटेलमध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित बहिणींपैकी एक अल्पवयीन असल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

चॅटिंगनंतर विश्वास संपादन

मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची काही दिवसांपूर्वी Tinder ॲपवरून दोन अनोळखी तरुणांशी ओळख झाली होती. काही काळ दोन्ही बाजूंनी चॅटिंग सुरू होते. या काळात आरोपींनी तरुणींचा विश्वास संपादन केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर दोन्ही बहिणींना भेटण्यासाठी नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात बोलावण्यात आले. त्यांना येण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून आरोपींनी ऑनलाइन टॅक्सी बुक केल्याचेही समोर आले आहे. टॅक्सीने सीवूड्स येथे पोहोचल्यानंतर आरोपींनी दोन्ही बहिणींना मॉल तसेच परिसरातील अन्य ठिकाणी फिरवले.

हेही वाचा:Slapur Crime: आजोबांनी सांगितलं अन् चोरीचं गूढ उकललं; मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाने जे केलं… 

बिअर पाजल्याचा आरोप

फिरत असताना आरोपींनी दोन्ही बहिणींना एका ठिकाणी नेले. तेथे त्यांना बळजबरीने बिअर पाजल्याचा आरोप आहे. दोन्ही बहिणी नशेत असल्याचा गैरफायदा घेत आरोपींनी त्यांना ‘थोडा वेळ विश्रांती घेऊ’ असे सांगून सीवूड्समधील एका हॉटेलमध्ये नेले. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलच्या खोलीत दोन्ही बहिणींवर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर दोन्ही बहिणी घरी परतल्या. त्यांनी घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.

हेही वाचा:‘मनःशांती मिळाली’ म्हणत पत्नीने पतीला संपवलं; पतीची हत्या अन् मृतदेहाची चिरफाड, काढलेले अवयव देवीला अर्पण करून तिला…

सीसीटीव्ही आणि टॅक्सीच्या तपशीलावरून तपास

या प्रकरणी मुंबईत प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी तो नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही पीडितांची वैद्यकीय तपासणी केली आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी मॉल आणि हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच आरोपींनी बुक केलेल्या ऑनलाइन टॅक्सीच्या तपशीलावरूनही त्यांचा माग काढला जात आहे. पीडितांपैकी एक मुलगी अल्पवयीन असताना तिला हॉटेलमध्ये प्रवेश कसा देण्यात आला, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने नियमांचे पालन केले होते का, याचाही तपासाचा भाग असणार आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणातील पुढील तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.

Web Title: Friendship via tinder a trap set using the dating app victims taken to a hotel after being made to drink beer two sisters sexually assaulted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 04:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.