Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! जत तालुक्यातील आश्रमशाळेतच मुलींवर अत्याचार? पोलिसांचे पथक घटनास्थळी

काही सामाजिक संघटनांनी लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठविला आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापणार आहे. यापूर्वीही शाळेत अत्याचार झाल्याची घटना घडली होती, पण ती परस्परच मिटविण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 25, 2025 | 02:49 PM
काम मिळवून देतो म्हणत कलाकेंद्रातील तरुणीवर सामूहिक अत्याचार; मारहाणही केली

काम मिळवून देतो म्हणत कलाकेंद्रातील तरुणीवर सामूहिक अत्याचार; मारहाणही केली

Follow Us
Close
Follow Us:

जत : जत तालुक्यातील एका गावातील आश्रमशाळेतील काही मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. पण, याबाबत पोलिस ठाण्यात मात्र कोणतीही नोंद झालेली नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असून, मुलींचे पालक दबावाखाली असल्याचे समजते.

तालुक्यातील एका गावातील आश्रमशाळेत सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील मुले-मुली शिक्षण घेत आहेत. या शाळेतील एकाने मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची चर्चा सुरू आहे. चार ते सहा मुलींवर अत्याचार झाल्याचे समजते. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेतील मुलींना घरी सोडण्यासाठी गेल्यानंतर पालकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्या नराधमाला पालक व गावकऱ्यांनीही चोप दिल्याचे समजते.

दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलिस प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे. पालकांनी पोलिसांत तक्रार केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधितांनी हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न चालवला आहे, पण लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सामाजिक संघटनांनी उठवला आवाज

काही सामाजिक संघटनांनी लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठविला आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापणार आहे. यापूर्वीही शाळेत अत्याचार झाल्याची घटना घडली होती, पण ती परस्परच मिटविण्यात आली. त्यामुळे संबंधितांचे धाडस वाढल्याचे सांगितले जात आहे. समाजकल्याण विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे. याबाबत काहींनी लोकप्रतिनिधींनाही माहिती दिली आहे. राजकीय पक्षाचे नेतेही यावर मौन पाळून आहेत. मुलींचे पालकही दबावाखाली असल्याचे समजते.

दोषी आढळल्यास कारवाई : संस्थाचालक

याबाबत संबंधित शाळेच्या संस्थाचालकांशी संपर्क साधला असता, त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला नाही. समाजमाध्यमातूनच ही बाब समजली असून, शुक्रवारी संस्थेतील कर्मचाऱ्यांकडे चौकशी करणार आहोत. यात कोणीही दोषी आढळल्यास त्याला संस्था पाठीशी घालणार नाही. दोषींना कायद्यानुसार शिक्षा व्हावी, अशीच संस्थेची भूमिका राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांचे पथक आश्रमशाळेत

आश्रमशाळा अत्याचारप्रकरणी तपासासाठी सनमडी आश्रमशाळेमध्ये पोलीस अधिकारी व धनश्री भांबुरे, सहाय्यक संचालक इतर बहुजन समाज कल्याण सांगली, निरीक्षक गायत्री फडणीस हे दाखल झाल्या आहेत. शाळेची चौकशी सुरू असून, गावकर्‍यांमध्ये संताप दिसून येते आहे. या चौकशीतून संबंधित संस्थेचे व संबंधित शिक्षक स्टाफचे अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. संस्थेचे चेअरमन हजर असून, संबंधित मुख्याध्यापक मात्र गैरहजर आहेत.

Web Title: Girls abused in the ashram school in jat taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • Physical Harassments
  • sangli news

संबंधित बातम्या

महायुतीत बिघाडी, प्रत्येक पक्ष लढणार स्वबळावर; सांगलीत नेमकं घडतंय काय?
1

महायुतीत बिघाडी, प्रत्येक पक्ष लढणार स्वबळावर; सांगलीत नेमकं घडतंय काय?

उमेदवारीसाठी सांगली भाजपचे शिष्टमंडळ पुन्हा मुंबईला, मुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्ष-पालकमंत्र्यांशी बैठक होणार
2

उमेदवारीसाठी सांगली भाजपचे शिष्टमंडळ पुन्हा मुंबईला, मुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्ष-पालकमंत्र्यांशी बैठक होणार

Sangli News: अफगाणी बेदाण्याची व्यापाऱ्यांकडून तस्करी, द्राक्षे बागायदार संघाकडून कोल्ड स्टोरेजवर धाडी
3

Sangli News: अफगाणी बेदाण्याची व्यापाऱ्यांकडून तस्करी, द्राक्षे बागायदार संघाकडून कोल्ड स्टोरेजवर धाडी

सांगली मनपामध्ये माजी खासदारांचे पॅनल, तासगावचा गड जिंकून संजयकाकांची सांगलीकडे कूच
4

सांगली मनपामध्ये माजी खासदारांचे पॅनल, तासगावचा गड जिंकून संजयकाकांची सांगलीकडे कूच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.