भाजपची सांगली शहर जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण आणि मावळत्या पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा दिमाखात संपन्न झाला.
काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. माजी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेणावर तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक बन्नेणावर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून मंजूर झालेले पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी माजी खासदार संजय पाटील यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने कायमचं सकारात्मक काम करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्यामुळे हा भरघोस निधी मिळाला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदची आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातींसाठी ७, मागास प्रवर्ग १६ आणि ३८ खुल्या जागांसाठी सोडत काढण्यात आली.
माजी खासदार संजय पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता संवाद बैठक बोलावली असून, बुधवारी दुपारी २ वाजता तासगाव येथील जनाई मंगल कार्यालयात ही बैठक होत आहे.
आमदार सत्यजित देशमुख यांच्या सूचनेनुसार, पुढील उपचार कराड येथील कृष्णा चॅरिटेबल रुग्णालयात सुरू आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील यांनी भेट देऊन विचारपूस केली.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र व क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
शनिवारी दिनांक २७ सप्टेंबरला होणारा कार्यकर्ता संवाद मेळावा अतिवृष्टीमुळे रद्द झाल्यानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी अखेर या मेळाव्याची नवीन तारीख जाहीर केली आहे.
सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेत विरोधकांकडून अत्यंत विचित्र, विक्षिप्त, विकृत भाषणे झाली. त्याला उत्तर देण्यासाठी सांगलीत इशारा सभा घेणार आहोत. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर शरद पवार गटाकडून सांगलीमध्ये आक्रमक मोर्चा काढण्यात येणार आहे.