IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत
पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २.२५ वाजता गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात चढण्यासाठी एका प्रवाशाने सुरक्षातपासणी केंद्रावर आपली बॅग एक्स-रे तपासणीसाठी ठेवली. यावेळी सीआयएसएफच्या कर्मचाऱ्याला बॅगेत संशयास्पद इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळल्या. त्यामुळे बॅगेची सखोल तपासणी करण्यात आली. त्यात परीक्षेत कॉपी करण्यासाठी वापरली जाणारी ३ अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, २ सिमकार्ड आणि ३ ब्लूटूथ इअरपीस सापडले. तसेच गोवा आयआयटीच्या भरती परीक्षेचे प्रवेशपत्रही मिळाले.
कॉपीसाठी उपकरणांचा वापर केल्याची कबुली
चौकशीदरम्यान, या उपकरणांचा परीक्षेत कॉपी करण्यासाठी वापर केल्याची कबुली प्रवाशाने दिली. त्याच्यासोबत प्रवास करणारा दुसरा साथीदार विमानात बसल्याची माहितीही त्याने सीआयएसएफला दिली. त्यानंतर विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुसऱ्या प्रवाशाची ओळख पटवून त्याला विमानातून उतरवण्यात आले. त्याच्या बॅगेतही अशाच प्रकारची उपकरणे आणि सिमकार्ड आढळले. दोघांना पुढील तपासासाठी गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ
दुसऱ्या उमेदवाराच्या जागी दिली परीक्षा
एका आरोपीने दुसऱ्या उमेदवाराच्या जागी परीक्षा दिल्याचा दावा केला आहे. सुरक्षा तपासणीच्या प्रतीक्षालयात त्याने फेकलेली इतर व्यक्तीची ओळखपत्रेही जप्त करण्यात आली. आपण संरक्षण आस्थापनात कर्मचारी असल्याचा त्यांचा दावा असून, त्याचीही पडताळणी केली जात आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






