नागौर : सध्या लग्नसराईचे (Marriage)दिवस सुरू आहे. या लग्नसंमारंभातील अनेक मजेशीर गोष्टी हल्ली सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असते. मात्र, राजस्थानच्या नागौरमधून एक अशी बातमी समोर आली आहे ज्याने तुमच्याही मनात भिती निर्माण होईल. लग्न आटोपून नवरीला वाजत गाजत घरी आणल्यानंतर नवरदेवासोबत एक विचित्र दुर्घटना घडली आहे. आपल्या खोलीत झोपलेल्या नवदेवाच्या अंगवार चालू असलेला फॅन पडून तो गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस (Ceiling Fan Fell On Groom) आली आहे. सध्या नवरदेवावर रुग्णालयात उपचार असून त्याच्या गळ्यावर तब्बल २६ टाके घालण्यात आले आहेत.
[read_also content=”आणि तो खेळ ठरला शेवटचा! बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने व्यक्तीचा मृत्यू, तासभर उपचार करुनही नाही वाचला जीव https://www.navarashtra.com/crime/man-dies-of-heart-attack-while-playing-badminton-in-noida-nrps-414401.html”]
नागौर येथील मार्बल व्यापारी असलेल्या इकराम सिसोदिया याचा निकाह ९ मे रोजी जन्नत मेहमूदसोबत झाला होता. शुक्रवारी रात्री निकाहच्या विधी झाल्यानंतर शनिवारी सकाळी जन्नत पुन्हा तिच्या माहेरी गेली. तर, लग्नात आलेल्या थकव्यामुळं इकराम त्याच्या खोलीत झोपायला गेला. त्यानंतर सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास त्याच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज आला. इकरामचा आवाज ऐकताच त्याचे कुटुंबीय खोलीत धावत गेले.
खोलीत जाताच त्यांन इकराम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या गळ्यावर व हातावर गंभीर जखम होती. तर, पलंगाच्या एका बाजूला सिलिंग फॅन पडलेला होता. इकराम झोपलेला असताना चालू असलेला सिलिंग फॅन त्याच्या अंगावर कोसळला. त्यामुळं पंख्याच्या पातीमुळं इकरामच्या गळ्यावर व हातावर गंभीर जखमा झाल्या. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले.
इकराम गंभीर जखमी झाला होता तसंच रक्तही खूप वाया गेले होते. त्यामुळं डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यास सुरुवात केली. इकरामच्या गळ्याजवळीत रक्तवाहिनी कापली गेली आहे. त्यामुळं रक्त जास्त वाहत आहे. कोणत्या दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याची परस्थितीदेखील नव्हती. त्यामुळं सरकारी रुग्णालयातच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. इकरामच्या गळ्यावर तब्बल २६ टाके घालण्यात आले आहेत. आधीपेक्षा इकरामची स्थिती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले, मकराना येथील हेड कॉन्स्टेबल प्रकाश यांनी रुग्णालयात जाऊन इकरामचा जबाब नोंदवला आहे. तसंच, त्याच्या घरी जाऊन तो झोपला होता ती खोलीदेखील पाहिली आहे. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची चौकशीदेखील केली आहे.
गंभीर जखमी झालेल्या इकरामचे वडिल रमजान सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या खोलीत माझा मुलगा झोपला होता. तिथला पंखा खूप जुना होता. पण तो कसा कोसळला हे आम्हालादेखील कळले नाही. या घटनेची परिसरात खूप चर्चा आहे.