Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… अन्यथा गय केली जाणार नाही”; अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून हायकोर्टाचा सरकारला इशारा

बदलापूरचे पोलीस अक्षय शिंदेला कायदेशीर पद्धतीने घेऊन जात असताना, अक्षयने पोलिसांची पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्याच्याकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा देखील प्रयत्न झाला आहे. या संदर्भात मुंब्रा पोलीस स्थानकात ३०७ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 25, 2024 | 03:14 PM
''...अन्यथा गय केली जाणार नाही''; अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून हायकोर्टाचा सरकारला इशारा

''...अन्यथा गय केली जाणार नाही''; अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून हायकोर्टाचा सरकारला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: बदलापूरमधील दोन अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात राजकारण तापले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांनी एसआयटी स्थापन केली असून ही एसआयटी डीसीपींच्या नेतृत्वाखाली तपास करणार आहे. अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकाराविरुद्ध अक्षयच्या आई-वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात त्याच्या आई-वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज हायकोर्टात न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी सरकारची बाजू हायकोर्टात मांडली. एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले.

युक्तिवाद झाल्यानंतर हायकोर्टाने सरकारी वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. हा एन्काऊंटर होऊच शकत नाही. या प्रकरणातील फॉरेन्सिक रिपोर्ट कोर्टात सादर करावा अन्यथा आम्हाला वेगळी पावले उचलायला लागतील, अशा गंभीर इशारा हायकोर्टाने दिला आहे. आरोपीच्या डोक्यात का गोळी मारली? पोलीस डोक्यावर की पायात गोळी मारतात? सामान्य व्यक्ती बंदूक चालवू शकतो का? चार पोलीस एका आरोपीला सांभाळू शकत नव्हते का? जे पोलीस अधिकारी जखमी झाले त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मानवाधिकार आयोगाकडे सादर करावे. या घटनेतील संबंधित अधिकारी कोर्टात आहेत का? असे अनेक प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केले आहेत. चुकीची माहिती सादर करू नये, अन्यथा गय केली जाणार नाही, अशा इशारा हायकोर्टाने दिला आहे.

आमचा पोलिसांवर संशय नाही, पण योग्य चौकशी होईल हवी, असे मत हायकोर्टाने मांडले आहे. सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवावे आणि ते असेल अशी आमची अपेक्षा आहे. आजच्या आणि पुढच्या सुनावणीत फरक दिसल्यास वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल असे स्पष्ट मत हायकोर्टाने मांडले आहे.

अक्षय शिंदे एन्कांऊटरप्रकरणी ठाणे पोलिसांनी मंगळवारी (२४ सप्टेंबर) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ठाणे पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शैलेश साळवी यांनी सोमवारी घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे. बदलापूरचे पोलीस अक्षय शिंदेला कायदेशीर पद्धतीने घेऊन जात असताना, अक्षयने पोलिसांची पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्याच्याकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा देखील प्रयत्न झाला आहे. या संदर्भात मुंब्रा पोलीस स्थानकात 307 कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच १३२ /१०९ /१३१ अन्वये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय शिंदेसंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलीस आयुक्त करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Web Title: High court hearing akshay shinde encounter case and warned of action if false information is given

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 02:56 PM

Topics:  

  • Akshay Shinde Encounter
  • badlapur crime news
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर टांगती तलवार? GR वर हायकोर्टाचा मोठा निर्णय
1

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर टांगती तलवार? GR वर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maratha Reservation: विषय गंभीर! हैदराबाद गॅझेटबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; भुजबळ म्हणाले…
2

Maratha Reservation: विषय गंभीर! हैदराबाद गॅझेटबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; भुजबळ म्हणाले…

मुंबई उच्च न्यायालयाने Jolly LLB 3 वरील बंदीची मागणी फेटाळली; म्हणाले- “आमची तर थट्टा….”
3

मुंबई उच्च न्यायालयाने Jolly LLB 3 वरील बंदीची मागणी फेटाळली; म्हणाले- “आमची तर थट्टा….”

मराठा आरक्षण धोक्यात येणार? सरकारच्या GR ला हायकोर्टात आव्हान, याचिकेत नेमके काय?
4

मराठा आरक्षण धोक्यात येणार? सरकारच्या GR ला हायकोर्टात आव्हान, याचिकेत नेमके काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.