दिल्लीत खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये सापडला आहे. दुर्गंधीमुळे लोकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेले पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
विशेष म्हणजे, सराई काळे खान परिसरातील सनलाईट कॉलनी पोलिसांना दुपारी बाराच्या सुमारास संशयास्पद प्लास्टिक असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी ती प्लास्टिक पिशवी उघडली असता त्यात महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळले.
[read_also content=”अरे देवा! धावत्या रेल्वेत संशयास्पद वस्तूचा स्फोट, संशयित बॅगधारक व्यक्ती चाळीसगाव येथेच झाला पसार, एक जखमी https://www.navarashtra.com/crime/big-breaking-suspicious-object-explodes-in-running-kushinagar-superfast-express-train-suspicious-bag-holder-missing-in-chalisgaon-one-injured-nrvb-376994.html”]
पांढऱ्या रंगाच्या या पॉलिथिनमध्ये महिलेची कवटी, कमरेचा खालचा भाग, चिरलेला हात आणि हाताचा पंजा आढळून आला. ही बातमी परिसरात आगीसारखी पसरली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. माहिती मिळताच एफएसएल टीमही घटनास्थळी पोहोचली आणि पुरावे गोळा केले. या हत्येचे गूढ उकलण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेला पाचारण करण्यात आले होते.